तुलसीविवाह कथा
फार वर्षापूर्वी जालंधर नावाचा महापराक्रमी राजा होता त्याने सर्व जगाला जिंकले आणि स्वर्ग जिंकला तो अजिंक्य झाला . त्याला हरवणे देवतांना अशक्य झाले. त्याचे महत्वाचे कारण होते त्याची पत्नी वृंदा जी पतिव्रता होती.
जालंधरचा नाश करण्यासाठी श्रीकृष्णाने युक्ती केली ,जेव्हा जालिंदर लढाई करण्यासाठी गेला तेव्हा श्रीकृष्ण जालिंधरचे रूप घेऊन वृंदाच्या घरी गेले आणि काही दिवस तिथेच राहिले. श्रीकृष्ण जालंधर म्हणून राहिल्यामुळे वृंदाचे पातिव्रत्य नष्ट झाले त्याचा परिणाम असा झाला ली जालिंदर लढाईत हरला आणि मरण पावला.
जेव्हा वृंदाला सर्व समजले तेव्हा तिने रागाने श्रीविष्णुंना श्राप दिला "तुला पत्नीचा वियोग सहन करावा लागेल. असे म्हणून वृंदाने अग्नीस आपला देह समर्पित केला आणि स्वतःचा जीव दिला
कपटाने महाप्रतिव्रतेला त्रास दिल्यामुळे आणि तिचा नाहक जीव गेल्यामुळे श्रीविष्णुंना खूप वाईट वाटले ते तिच्या मृत देहाजवळ खूप दिवस तसेच बसून राहिले.
नंतर पार्वती देवीने वृंदेच्या चितेजवळ जाई , तुळस आणि आवळा हि झाडे नव्याने निर्माण केली. त्या झाडांमधील तुळस हि वृंदा आहे असे श्रीकृष्णाला वाटले. पुढे भविष्यात वृंदेने रुक्मिणीचा अवतार घेऊन श्रीकृष्ण यांच्याशी कार्तिक शुद्ध द्वादशीला विवाह केला. तेव्हापासून तुलसीविवाह करण्याची प्रथा संपूर्ण भारतात पडली. आणि तेव्हापासून तुलसी हि पतिव्रता आणि पवित्र असल्याकारणाने तिला प्रत्येक घराच्या अंगणात मान मिळाला
कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमा या दिवसापर्यंत तुलसीविवाह करण्याची प्रथा आहे.
0 टिप्पण्या