पावसाळ्यात घ्यायची काळजी
उन्हाळा संपून जून महिन्यात पावसाची चाहूल लागते. उन्हाळ्यात गरम होत असल्याने पाऊस येताच आपण पावसात भिजण्याचा आनंद घेतो पण हे सर्व करत असताना आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
- भिजल्यावर लगेच अंग केस व्यवस्थित पुसावेत नाहीतर सर्दी होऊ शकते
- पावसाळ्यात बाहेर जाताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवावा
- शक्यतो पहिल्या पावसात भिजल्यावर घामोळ्या जातात
- नंतर पावसात भिजू नये
- भिजण्याचा प्रसंग आलाच तर लगेच अंग केस पुसून , सुके कपडे घालावेत .
- आले, तुळशीची पाने , गवती चहा टाकून चहा घ्यावा
- कॉफी किंवा दूध घेऊ शकता.
- म्हणजे शरीराचे अचानक कमी झालेले तापमान वाढेल आणि सर्दी पडसे होणार नाही
- पावसाळ्यात ओले कपडे घालू नयेत
- ओले शूज , चप्पल वापरू नये याने पायांना जखम होऊ शकते
- हात पाय कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून त्यात ५मिनिटे ठेवावेत नंतर व्यवस्थित पुसून त्यावर खोबरेल तेल किंवा मॉइश्चराइझर लावावे.
- पायांना भेगा पडल्या असतील तर रोग घरचे तूप लावावे
- पायात मोजे घालावे
- फार तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
- केसांना रोज तेल लावावे.
- चेहऱ्याला कोल्ड क्रीम लावावे
अशाप्रकारे जर तुम्ही काळजी घेतलीत तर तुम्ही पावसाळ्याचा आनंद घेऊ शकता

0 टिप्पण्या