सुलभभारती मराठी इयत्ता चॊथी
कविता संगणक
घरीच माझ्या
संगणक आणणार,
अचूक गणित
त्यावर करणार.
सुबक सुंदर
काढणार चित्र,
देश - विदेशांत
जोडणार मित्र.
संगणकाद्वारे आता
संवाद साधणार,
दूरच्या व्यक्तीचा
चेहरा बघणार.
घरीच बसून
जग बघणार.
व्यवहार सारे
झटपट करणार.
0 टिप्पण्या