हर्बल फेशिअल
आपल्या नाजूक सुंदर चेहऱ्याला काही समस्या झाल्यास ,जसे कि मुरूम पुटकुळ्या,सुरकुत्या डोळ्याखाली काळे येणे रॅश येणे आपण सौन्दर्यतज्ज्ञांचा सल्ला घेतो परंतु आपण हे विसरतो कि आपल्याच स्वयंपाकघरात आणि बागेत सौन्दर्यवर्धक आहेत. त्याचा वापर न करता आपण निरनिराळे केमिकल्स असलेले क्रिम्स वापरतो . त्याने तात्पुरता फरक नक्कीच पडतो पण कालांतराने पुन्हा ह्या समस्या डोके वर काढतात. त्यामुळे जर आपण नियमितपणे घरातील वस्तूंचा वापर केला तर आपल्या सौन्दर्याच्या सर्व समस्या दूर होतात आणि आपला वेळही वाचू शकतो.
खालीलप्रमाणे तुम्ही जर नॆसर्गिक पदार्थ वापरून हर्बल फेशिअल केले तर आपले सौन्दर्य अबाधित राहू शकते. ह्याचा आपल्या चेहऱ्याला साईड इफेक्ट हि होणार नाही.
कृती:-
प्रथम पूर्वतयारी करावी ( केस बांधून त्यावर फेशिअल बेल्ट लावावा, ऍप्रन घालावे. )
क्लिंझिंग - दूध आणि लिंबू रस एकत्र करून १० मिनिटे क्लिंझिंग करावे.
स्टीम - त्यानंतर स्टीम घेताना पाण्यात पुदिन्याची पाने आणि लिंबू रस टाकावा. स्टीम घेताना
कोरड्या त्वचेसाठी - ५ मिनिटे
तेलकट त्वचेसाठी - १० मिनिटे आणि
सावळ्या किंवा माध्यम त्वचेसाठी ७ ते ८ मिनिटे स्टीम घ्यावी.
स्क्रबिंग - गव्हाचा कोंडा आणि दूध एकत्र करून १० मिनिटे स्क्रब करावे. नंतर चेहरा साध्या पाण्याने धुवून घ्यावा.
मसाज - मसाज करताना गळ्याकडून वरील बाजूस करावा हनुवटीपासून गालाकडे -कानाकडे गोलाकार बोटे फिरवावी . आता दोन्ही बोटावर रस घेऊन नाकावर आणि डोळ्याच्या खाली हळुवार मसाज करावा. १५ ते २० मिनिटे करावे.
कोरड्या त्वचेसाठी -
१. गाजर रस ४ चमचे + मध १ चमचा , किंवा
२. अंड्याचा पांढरा बलक + १ चमचा मध.
तेलकट त्वचेसाठी -
१. संत्रा साल पावडर + लिंबू रस आणि मसूर डाळीची पिठी
२. बेसन पीठ ४ चमचे + गुलाबपाणी + कोरफड गर
सावळ्या किंवा माध्यम त्वचेसाठी - तांदुळाची पिठी + गुलाबपाणी + हळद
मसाज झाल्यावर चेहरा न धुता फक्त ओल्या नॅपकिनने पुसून फेसपॅक लावावा.
फेसपॅक -फेसपॅक लावल्यावर चेहऱ्याची जास्त हालचाल करू नये.
कोरड्या त्वचेसाठी - बदाम दुधात उगाळून लावावे. १० मिनिटांनी धुवावे.
तेलकट त्वचेसाठी - एक काकडीचा गर बारीक वाटून त्यात २ चमचे दही एकत्र करून हा लेप चेहऱ्यावर लावावा २० मिनिटांनी धुवावे.
सावळ्या किंवा माध्यम त्वचेसाठी - २ चमचे मुलतानी माती + ४ चमचे गुलाबपाणी एकत्र करून हा लेप चेहऱ्यावर लावावा. तो वाळल्यावर धुवावे.
सूचना: -
जर पातेल्यात स्टीम घेणार असल्यास डोळे बंद ठेवावे.
फेसपॅक किंवा मसाज क्रिम डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी.
ब्लॅक हेडस असल्यास फेसपॅकमध्ये टोमॅटोचा रस मिक्स करावा.

0 टिप्पण्या