Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

बलिप्रतिपदा -दिवाळी पाडवा

बलिप्रतिपदा -दिवाळी  पाडवा 


       पाडव्याला दीपोत्सव केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
यामागील कथा अशी आहे कि,असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षस कुळात जन्म घेऊनही प्रजाहित दक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती‌. दानशूर म्हणूनही बळीराजाची ओळख होती.पण पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला.आणि त्याला गर्व झाला कि आता त्याला या जगात कोणीच हरवू शकत नाही. अगदी देवही त्याचा पराभव करू शकणार नाही आणि त्यामुळे तो अमर झालेला आहे असा त्याचा समज होतो. 
एकदा बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती.तेव्हा श्री विष्णू भगवान यांना वाटले कि चला याचा गर्वहरण करूयात. भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजाला वामनाने तीन पावले भूमी मागितली.वचनाला जागून बळी राजाने हे दान देण्याची तयारी दाखविली तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि न पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शल्लिक न राहिल्याने भगवान विष्णूनी विचारले कि,आता मी माझा तिसरा पाय कोठे ठेऊ वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले आणि बोलला कि,कृपया आपला तिसरा पाय माझ्या डोक्यावर ठेवा. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ राज्य बहाल केले.
तो दिवस होता कार्तिक शुद्ध प्रतिपदा.बळीराजा गर्विष्ठ झाला तरीही सत्त्वशील, दानशूरपणा या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वर दिला, की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्यादानशूरतेची,पूजा करतील.म्हणून लोक हा दिवस बळीप्रतिपदा म्हणून साजरे करतात.पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी करतात
तसेच या दिवसाला पती पत्नीच्या प्रेमाचे प्रतीक मानतात पत्नी पतीला औक्षण करते आणि पती तिला सोने किंवा वस्त्रे भेट देऊन तिचे रक्षण करण्याचे वाचन देतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या