भाऊबीज
दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज. कार्तिक
शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या सणामुळेच
बहीण भावाच्या नात्याला बंध निर्माण होतात. हा दिवाळीचा सर्वात शेवटचा दिवस आहे. दिवे लावले जातात आणि घर सजवले जाते. प्रत्येक बहीण भावांसाठी हा सण महत्वपूर्ण आणि उत्साहवर्धक असतो.
यामागील
कथा अशी आहे कि,एकदा यमदेवता
आपली बहीण यमुना म्हणजे यमी हिच्या घरी खूप दिवसांनी जातात. तेव्हा यमीला खूप आनंद होतो. ती भावाला म्हणजेच
यमदेवाला उटणे लावून गरम पाण्याने आंघोळ घालते ,त्याला नवीन वस्त्रे घालण्यास देते. पाटाभोवती रांगोळी काढून यमदेवाचे औक्षण करते त्याच्या आवडीचे पदार्थ करून त्याला खायला घालते.
तेव्हा
तिच्यावर प्रसन्न होऊन तिला वर देतो कि मी दरवर्षी याच
दिवशी तुला भेटायला येईल. तो दिवस होता कार्तिक शुद्ध द्वितीया यम आपली बहीण यमी हिच्या
घरी गेला म्हणून या दिवसाला "यमद्वितीया"
असे नाव मिळाले
त्या दिवसा नंतर प्रत्येक बहिणी आणि भाऊ हा सण साजरे करतात. बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुषी आणि सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करतात. बहीण आपल्या भावासाठी मिठाई आणि प्रेमळ पदार्थ तयार करते. ज्या भाऊ नाहीत अशा स्त्रिया चंद्रची भावाप्रमाणे पूजा करतात.
0 टिप्पण्या