Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन)

नारळी पौर्णिमा  (रक्षाबंधन)



                श्रावण शुद्ध पौर्णिमा ह्या दिवशी रक्षाबंधन ह सण साजरा केला जातो. ह्याला नारळी पोर्णिमाही म्हटले जाते. नारळी पौर्णिमा  हा दिवस कोळी बांधवासाठी विशेष महत्वाचा असतो  यादिवशी पावसाळा सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच कोळी बांधव मासेमारी करण्यासाठी जात असतात. कारण पावसाळा हा काळ माश्यांच्या प्रजननाचा काळ असतो त्यामुळे त्याकाळात कोळी लोक मासेमारी करीत नाहीत. मासेमारीला सुरुवात करण्याआधी ते भव्य अशी मिरवणूक काढली जाते ,समुद्राची पूजा करतात आणि समुद्रदेवतेला नारळ अर्पण करतात. त्यामुळे या दिवसाला "नारळी पूणव" किंवा "नारळी पौर्णिमा" म्हणतात.                   

                यामागील एक कथा आहे. द्वापारयुगामध्ये शिशुपाल वधाच्या वेळी श्रीकृष्णाचे बोट कापले गेले तेव्हा द्रौपदीने क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या शालू  साडीचा पदर फाडून कृष्णाच्या हाताला बांधला. त्यामुळे श्रीकृष्णाने द्रौपदीला आपली बहीण मानले. तेव्हा श्रीकृष्णाने द्रौपदीला वाचन दिले हि कधीही तुला माझी गरज असेल तर तू फक्त हाक मार मी तुझे रक्षण करेन . नंतर जेव्हा दुःशासन द्रौपदीचे वस्त्रहरण करत होता तेव्हा तिने कृष्णाला तिचे रक्षण करण्याचे आवाहन केले आणि त्यानंतर श्रीकृष्णाने तिला हजारो साड्या दिल्या त्यामुळे तिचे वस्त्रहरण होऊ शकले नाही. अशाप्रकारे यामागचे तात्पर्य असे कि आपण देवासाठी थोडे केले तरी देव आपल्याला काही कमी पडू देत नाहीत.  तेव्हापासून रक्षाबंधन हा सण साजरा करण्याची प्रथा सुरु झाली.

                 बहीण रक्षाबंधनाच्या दिवशी पाटाभोवती रांगोळी काढते त्याला भावाला बसवून औक्षण करून ओवाळते आणि राखी बांधते, तसेच त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते नंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. यादिवशी पुरणपोळी आणि नारळीभात करण्याची प्रथा असते.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या