Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

नागपंचमी

नागपंचमी


                श्रावण शुद्ध पंचमीला हा सण साजरा करतात स्त्रिया नटून थाटून वारुळाला जातात त्याची पूजा करतात. नवविवाहित मुली आपल्या माहेरी येतात. हातावर मेहंदी काढतात .यावेळी श्रावणातील विविध खेळही खेळले जातात. तसेच झाडांना झोका बांधून गाणीही म्हटली जातात.


              यामागील कथा अशी कि फार वर्षांपूर्वी एकदा नागपंचमीच्या दिवशी एक शेतकरी शेतामध्ये काम करत असतो. त्याच्या शेतात एक वारूळ असते एका नागाने त्याची अंडी त्यात ठेवलेली असतात. जेव्हा नाग त्याचे अन्न शोधण्यासाठी बाहेर जातो त्यावेळेसच शेतकरी त्याचे बैल घेऊन नेमके त्याच जागी नांगरणी करतो जेथे त्या नागाने त्याची अंडी ठेवलेली असतात. त्यामुळे अंडी फुटतात आणि त्यातील पिल्ले मारून जातात.  थोड्यावेळाने नाग तिकडे येतो आणि पाहतो तर त्याची अंडी फुटली आहेत आणि पिल्ले मरून गेली आहेत. त्याला समजते कि शेतकऱ्यानेच त्याच्या पिल्लाना मारले आहे. 


              नाग त्या शेतकऱ्याला , त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलाला, त्याच्या संपूर्ण कुळाला दंश करून मारून टाकतो. मग त्याला कळते कि शेजारच्या गावामध्ये शेतकऱ्याची मुलगी आहे जीचे लग्न झालेले आहे. नाग रागाने सरपटत तिच्या गावी जातो तिच्या घरी जातो.

              नाग तिला दंश करणार इतक्यात त्याला दिसते कि शेतकऱ्याची मुलगी खाली बसलेली आहे आणि समोर पाटावर तिने एक नागप्रतिमा ठेवलेली आहे आणि ती त्याची मनोभावे पूजा करत आहे. नैवेद्य म्हणून दूध लाह्या अर्पण केलेल्या आहेत. नागाचे मन एकदम बदलते तो शांत होतो .नागाला फार वाईट वाटते कि,मी हिच्या पूर्ण कुटुंबाला मारून टाकले आणि हिला दंश करण्याच्या विचारात आहे. आणि हि आपली मनोभावे पूजा करते आहे. 

              तेव्हड्यात शेतकऱ्याची मुलगी पूजेसाठी बंद केलेले डोळे उघडते समोर नाग पाहून घाबरते.  नाग तिला म्हणतो घाबरू नकोस आणि तो तिला शेतात घडलेली संपूर्ण हकीकत सांगतो . हे एकूण मुलीला फार वाईट वाटते. आणि ती रडू लागते. तेव्हा नागाला तिची दया येते आणि तिची भक्ती पाहून नाग तिच्यावर प्रसन्न होतो. नाग तिला एक औषध देतो आणि म्हणतो कि हे औषध तुझ्या पूर्ण कुटुंबाला पाज ते सर्व जिवंत होतील ती खुश होती आणि नागाला नमस्कार करून आपल्या माहेरी जाते आणि सर्वाना ते औषध पाजते मग ते जिवंत होतात 

               शेतकरी तिला विचारतो ज्या व्रतामुळे आम्हाला जीवनदान मिळाले ते व्रत कसे करायचे ते आम्हास सांग आम्हीही ते व्रत करू. तेव्हा ती सांगते कि,नागपंचमीच्या दिवशी एक पाट घेऊन त्यावर नाग नरसोबा फोटो ठेऊन त्याला लाह्यांचा हार घालायचा नैवेद्य दूध लाह्या ठेवायचा . तुपाचा दिवा लावावा. पांढरी फुले वाहावीत मनोभावे पूजा करावी . तसेच त्या दिवशी शेतात नांगरणी करू नये, जमीन खोदु नये.तव्यावर शिजून खाऊ नये. चिरू नये, कापू नये.          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या