Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

हरितालिका

हरितालिका


हरितालिका व्रत


हरितालिका हे व्रत देवी पार्वतीने भगवान शंकर यांना पती म्हणून मिळवण्यासाठी केले होते. त्यामागील कथा अशी हिमालय पर्वत यांची पुत्री पार्वती हि शंकर भगवान यांची पत्नी सती हिचा पुनर्जन्म होता. ती जेव्हा विवाहयोग्य झाली तेव्हा हिमालय पर्वत तिच्यासाठी वरसंशोधन करण्यास सुरुवात केली.

 त्याच सुमारास तारकासुराने वर मिळवला होता कि, त्याचा वध फक्त भगवान शंकरांचा पुत्र करू शकेल. आणि त्याने पृथ्वी वरती हाहाकार माजवण्यास सुरुवात केली आणि सर्व देवांना हे माहित होते कि, पार्वती हि सतीदेवीचा पुनर्जन्म आहे. आणि जर शंकर भगवानांचा विवाह पार्वतीसोबत झाला नाही तर तारकासुर मारला जाणार नाही. त्यामुळे सर्व देव त्यामुळे सर्व देव श्री विष्णूकडे गेले, मग त्यांनी नारदमुनींना पार्वतीकडे जाऊन तिला पूर्वजन्माची आठवण करून देण्यास सांगितले.

त्यानुसार देवर्षी नारद हिमायलपर्वत जे नारदांचे भाऊ होते, त्यांच्या घरी गेले, आणि पार्वतीला पूर्वजन्माची आठवण करून दिली. आणि तिला सांगितले कि भगवान शंकराशी विवाह करण्यासाठी तिला त्यांचे पूजन, तप करावे लागेल , परन्तु या सर्वांला हिमालय पर्वतांनी विरोध केला. ते म्हणाले कि, शंकराचे राहणीमान चांगले नाही तसेच त्यांच्याकडे महाल नाही ते तुला कोठे ठेवतील.

 त्यानुसार पार्वती आपल्या वडिलांचा विरोध पत्करून  पार्वती आपल्या सखीसोबत अरण्यात जाऊन एक मातीची पिंड बनवली आणि घोर तप केले. अरण्यात तिने फक्त झाडाची फळे आणि पाला खाल्ला तसेच ऊन,वारा , पाऊस कशाचीही तमा न बाळगता घोर असे तप केले.

भगवान शंकर देवी पर्वतीवर प्रसन्न झाले आणि त्यांच्यासमोर विराट रूपात प्रकट झाले आणि हवा तो वर मागण्यास सांगितले. . तेव्हा देवी पार्वतीने त्यांना “तुमच्याशी लग्न करण्यासाठी हे तप मी केले आहे बाकी मला काही नको.”त्यावर शंकर भगवान बोलले कि, मी एक वैरागी आहे. तर देवी पार्वती बोलल्या कि मला तुम्ही जसे आहात तसेच चांगले आहात , नंतर शंकर भगवान "तथास्तु" बोलून अंतर्धान पावले. अशाप्रकारे देवी पार्वतीला आपला मनोवांच्छित असा वर भेटला.

 तेव्हापासून  सर्व कुमारिका आपल्याला चांगला वर भेटावा म्हणून मनोभावे हे व्रत करतात आणि आजन्म हा घेतलेला वसा जपतात.  आणि हे व्रत शंकराचे असल्यामुळे भविष्यात त्यांच्या सौभाग्यचे रक्षण भगवान शंकर करतात. आणि त्यांचा संसार सुखाचा होतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या