दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. समाजातील अहंकारी, अत्याचारी वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा, यासाठी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. या दिवशी घर परिसराची सफाई व सूर्योदयापूर्वी अंगाला उटणे आणि तेल लावून स्नान केले जाते.
मग लोक आनंदी होतात.तो दिवस आंनदाने साजरा करतात. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला त्या दिवशी अश्विन कृष्ण चतुर्दशी असते म्हणून त्या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणतात. हा दिवस लोक पहाटे उठतात आणि त्याच्या शरीरावर उटणे लावतात,स्नान करतात यालाच अभ्यंग स्नान म्हणतात.
अश्विन कृष्ण चतुर्दशीस मृत्युदेवता यमराजाची पूजा करण्याची प्रथा आहे. यादिवशी दक्षिणेकडे तोंड करून दिवे ठेवले जातात. असे केल्याने कमी वयात मृत्यू किंवा नरक यातनांपासून मुक्ती मिळते किंवा याची भीती राहत नाही असा समज आहे. दीपदान केले जाते. दिवा हा अज्ञानाचा अंध:कार दूर करण्याचे आणि तेज, समृध्दी यांचे प्रतीक असल्याने दीपदानाचे महत्त्व मोठे आहे.

0 टिप्पण्या