वटपौर्णिमा
हा उत्सव नवरा-बायकोच्या नात्यावर आहे.
प्रत्येक पत्नी आपल्या पतीच्या आयुष्यासाठी, यशासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करते.
त्यामागील कथा अशी कि, फार पूर्वी सत्यवान आणि सावित्री यांचा विवाह होतो. ऐके दिवशी देवऋषी नारद सावित्रीला सांगतात कि, तुझा नवरा सत्यवान लग्नानंतर एका वर्षाने मरण पावणार आहे. लग्नाला एक वर्ष पूर्ण होते त्या दिवशी सत्यवान जंगलामध्ये लाकडे तोडण्यासाठी जात असतो , सावित्रीला माहित असते कि, आजच आपल्या नवऱ्यावर संकट येणार आहे. त्यामुळे त्यादिवशी तीही सत्यवानसोबत जंगलामध्ये जाते.
सत्यवान लाकडे तोडण्यासाठी झाडावर चढतो त्याबरोबर सत्यवानाला चक्कर येते आणि तो झाडावरून खाली कोसळतो सावित्री त्याचे डोके आपल्या मांडीवर घेते. तेव्हड्यात तिला मृत्युदेवता यम आलेले दिसतात आणि ते सत्यवानाचे प्राण घेऊन दक्षिण दिशेकडे निघतात. सावित्री हे पाहते आणि यमदेवाच्या पाठीमागे जाते. त्यांच्या मागोमाग चालत असते. हे पाहून ते सावित्रीला बोलले कि," हे देवी जितकी तुमच्या दोघांची साथ होती तितकी तुम्ही सोबत होतात आता तू इथून पुढे येऊ शकत नाही". त्यावर सावित्री बोलते कि,"जिथे जिथे माझे पती जातील तिथे तिथे मी जाणारच आमची गाठ सात जन्मांची आहे. ती सहजासहजी तुटणारी नाही हेच सत्य आहे".
आणि सावित्री यमदेवाच्या बरोबरीने चालत राहते आणि यमलोकापर्यंत जाते.
तेव्हा कंटाळून यमदेव सावित्रीला समजावतात कि मी एकदा घेतलेले प्राण परत देऊ शकत नाही. त्यावर सावित्री बोलते कि, "एकतर मला माझ्या पतीचे प्राण परत करा किंवा मलाही त्यांच्यासोबत इथेच राहुद्यात". तेव्हा यमदेव बोलतात,"तुझा मृत्यूचा समय अजून आलेला नाही, पण तुला मी रिकाम्या हाताने पाठवणार नाही. तू एक वर माग ".
तेव्हा सावित्री विचारपूर्वक वर मागते कि," माझ्या सासू सासर्यांना स्वतःच्या राज्यात माझ्या मुलांना सोन्याच्या पाळण्यात पाहता यावे". यमदेव काहीही विचार न करता "तथास्तु" म्हणतात.
आणि मग त्याच्या लक्षात येते कि आपण अप्रत्यक्षपणे सत्यवानाचे प्राणच सावित्रीला दिले आहेत कारण सावित्री आणि सत्यवान यांना एकही अद्यापपर्यंत मुलं नसते. आणि सावित्री मुले होण्याचा वर मागते.
पण तरीही यमदेव सावित्रीच्या चतुरपणावर आणि तिच्या पतीवरील भक्ती आणि श्रद्धा पाहून खुश होतात. आणि सत्यवानाचे प्राण परत करतात. अशाप्रकारे सावित्री एकाच वरामध्ये तीन गोष्टी मागून घेते एक पतीचे प्राण , दुसरे सासू सासर्यांचे डोळे आणि तिसरे त्यांचे गेलेले राज्य.
तेव्हापासून प्रत्येक स्त्री आपल्या पतीसाठी हे व्रत करते. वडाच्या झाडाला सात फेऱ्या घालतात आणि सात जन्म पतीची साथ लाभावी अशी प्रार्थना करतात.

0 टिप्पण्या