नवरात्री घटस्थापना
Photo by Sonika Agarwal on Unsplash
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध दशमीपर्यंत नवरात्री हा उत्सव साजरा केला जातो. भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात देवीची पूजा केली जाते. रेणुका ,दुर्गा ,महालक्ष्मी , कालीमाता, शारदा , सरस्वती,जगदंबा, भवानी हि आणि अशीच असंख्य नावे. नावे वेगवेगळी असली तरी देवीची शक्ती आणि भाविकांची भक्ती मात्र सारखीच पाहायला मिळते.नवरात्र हे राज्य बंगालमध्ये दुर्गा पूजा म्हणूनही ओळखले जाते.
प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना केली जाते. त्यासाठी एक चौरंग स्वछ धुवून पूर्व - पश्चिम जागेवर ठेवला जातो. बाजूने रांगोळी काढली जाते. चौरंगावर नवीन वस्र टाकले जाते. त्यावर टोपली ठेऊन त्यात काळी माती ठेवली जाते. त्यात सात प्रकारचे धान्य पेरले जाते. त्यावर मातीचा कलश ठेऊन, त्यात पाणी,दुर्वा , नाणे , सुपारी, टाकून त्यावर आंब्याची डहाळी किंवा पाच विड्याची पाने ठेवली जातात. त्यावर नारळ ठेऊन चुनरी दिली जाते.हार घातला जातो. पाच फळे , ओटी ठेऊन धूप अगरबत्ती आणि दिवा अथवा समई लावली जाते. समई नऊ दिवस समई निरंतर नंदादीपाप्रमाणे तेवत ठेवतात. प्रत्येक दिवशी फुलांची एक एक माळ घटावर सोडली जाते.
सातव्या माळेला देवीला प्रसाद म्हणून कडाकण्या केल्या जातात. तसेच पिठाच्या वेणी , फणी , आरसा,बांगडी तयार करून अर्पण केले जातात. सकाळ संध्याकाळी देवीची आरती केली जाते. रोज घटामध्ये पाणी सोडले जाते.
अष्टमीला नऊ कुमारिकांना बोलावून त्यांचे पाय धुवून , हळदी कुंकू लावून पूजा केली जाते. त्यास कुमारिका पूजन असे म्हणतात. भक्तगण नऊ दिवस उपवास करतात. तसेच अनवाणी चालतात. सुखसाधने वापरात नाहीत. यामागे भाविकांची श्रद्धा आहे कि, देवी नऊ दिवस काही ना खाता पिता तसेच ना झोपता दानवांचा नाश करण्यासाठी सज्ज असते.
आदिशक्ती म्हणजे पार्वती. आणि तिची तीन रूपे म्हणजे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती . त्यातून सर्व कुलदेवीची निर्मिती झाली.महाकाली आपल्यावर येणाऱ्या संकटांचे निरसन करते. महालक्ष्मी धनसंपत्ती देते. महासरस्वती अध्यात्मिक आणि शैक्षणिक प्रगती देते. सर्व शक्तींचे एकत्रित स्थान म्हणजेच श्रीयंत्र आहे. सर्व यंत्रांमध्ये श्रीयंत्र खूप प्रभावी असते.
नवरात्रीच्या काळात तसेच जमेल तेव्हा श्रीयंत्राला स्मरण करून शांतपणे श्रीसूक्ताचे पठण सोळा वेळा करावे. लक्ष्मीपूजन, दसरा , कोजागिरी पौर्णिमा , धनत्रयोदशी, प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा आणि नवरात्रीच्या काळात तसेच जमेल तेव्हा श्रीयंत्राला स्मरण करून शांतपणे श्रीसूक्ताचे पठण सोळा वेळा करावे.
नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी देवीला एक खास नाव आहे. ती पाहुयात
पहिला दिवस शैलपुत्री म्हणजे पर्वताचा राजा हिमालय यांची पुत्री.
दुसरा दिवस ब्रह्मचारिणी म्हणजे जगाला प्रेमाचा संदेश देणारी
तिसरा दिवस चंद्रघंटा म्हणजे जगाला न्याय देणारी
चौथा दिवस कुष्मांडा म्हणजे जगाला रोजचे अन्न पुरविणारी
पाचवा दिवस स्कंदमाता म्हणजे चांगल्या गोष्टी आणि सत्तेचे ज्ञान देणारी
सहावा दिवस कात्यायनी म्हणजे द्रुष्ट प्रवृतींशी झगडणारी
सातवा दिवस काळरात्री असुरांचा तसेच द्रुष्ट प्रवृत्तीचा नाश करणारी
आठवा दिवस सिद्धीदात्री म्हणजे सिद्धी देणारी आणि मंत्र तंत्र प्रविण असलेली देवी.
नववा दिवस चामुंडा म्हणजे चंड आणि मुंड या असुरांना मारून त्यांची मुंडकी गळ्यामध्ये हाराप्रमाणे घालून मिरवणारी
महत्व श्रीयंत्राचे

0 टिप्पण्या