पापलेट फिश फ्राय - करी
कोर्स: डिनर / लंच पाककृती: भारतीय तयारीची वेळ: १५ मिनिटे कूक वेळः 20 मिनिटे एकूण वेळ: ३५ मिनिटे सर्व्हिंग्ज: ४ सर्व्हिंग्ज
साहित्य: -
- ४ मोठे ताजे पापलेट
- १/२ वाटी ओले खोबरे
- २ मोठे लाल टोमॅटो उकडून घ्यावे
- १ कांदा
- २ आमसूल
- १ चिंच
- १ चमचा लाल तिखट
- १/२ चमचा हळद
- १/२ चमचा मीठ
- घरगुती मसाला
- १ चमचा लसूण पेस्ट
- १ वाटी रवा
कृती :-
- चिंच १/२ वाटी पाण्यात १ तास भिजत ठेवावे.
- प्रथम पापलेट साफ करून तीन तुकडे कापून, स्वच्छ धुऊन घ्यावे.
- एका मोठ्या बाऊलमध्ये पापलेट घेऊन त्यात हळद, मीठ, लाल तिखट आणि अमसूलची पावडर टाकून व्यवस्थित हलून १५ ते २० मिनिटे झाकून ठेवावे.
- टोमॅटोच्या साली काढून मिक्सरवर बारीक प्युरी करावी.
- कांदा अख्खा सालीसकट डायरेक्ट गॅसवर भाजावा. त्याचप्रकारे खोबऱ्याची वाटी भाजावी. गार झाल्यावर कापून बारीक पेस्ट करावी.
- एका खोलगट तव्यात तेल गरम करण्यास ठेवावे. तेल व्यवस्थित तापल्यावर झाकून ठेवलेले ५ ते ६ पापलेट तुकडे एक एक करून रव्यात घोळवून तव्यात हळुवार टाकावे.
- साधारणपणे तीन मिनिटांनी पलटी करावे. तळताना गॅस मोठया आचेवर ठेवावा
- दोन मिनीटांनी तेलातून निथळून टिशूपेपर वर काढून घ्यावे. अशाप्रकारे सर्व पापलेट तुकडे तळून घ्यावे.
- एका कढईत तेल गरम करून त्यात हळद, लाल तिखट, मीठ, घरगुती मसाला घालून त्यात २ मिनिटे परतावे नंतर त्यात लसूण पेस्ट आणि टोमॅटो पुरी घालून तेल सुटेपर्यंत परतावे.
- त्यात कांदा - खोबरे पेस्ट टाकून छान परतून घ्यावे.
- त्यात कोमट पाणी १ ग्लास ओतावे आणि पापलेटचे डोक्याचे तळलेले तुकडे टाकावे उकळू द्यावे.
- २ ते ३ मिनिटे उकळल्यावर गॅस बंद करावा
- आपली पापलेट फिश फ्राय करी तयार आहेत.
सूचना: -
- तिखट आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकावे
- साफ करताना पापलेट चे डोळे काढावे नाहीतर तळताना ते उडतील
- मासे तळताना सतत पलटू नये.

0 टिप्पण्या