कुरडईची सुकी भाजी
कोर्स: डिनर / लंच पाककृती: भारतीय तयारीची वेळ: ५ मिनिटे कूक वेळः १0 मिनिटे एकूण वेळ: १५ मिनिटे सर्व्हिंग्ज: ४ सर्व्हिंग्ज
साहित्य: -
- ८ ते १० कुरडया
- २ मोठे कांदे
- १ टोमॅटो
- १/२ वाटी तेल
- १/२ चहाचा चमचा मोहरी
- १/२ चहाचा चमचा जिरे
- १/२ चहाचा चमचा मीठ
- १/२ चहाचा चमचा घरगुती मसाला / कांदा लसूण मसाला
- १/२ चहाचा चमचा लाल तिखट
- १/२ चहाचा चमचा हळद
- २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती :-
- प्रथम कुरडईचा माध्यम आकाराचा चुरा हाताने करावा . आणि त्यात एक ग्लास साधे पाणी टाकून ठेवावे
- पाच मिनिटांनी कुरडईमधील पाणी काढून ठेवावे
- कांदे आणि टोमॅटो बारीक कापून वेगवेगळे ठेवावे.
- एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरे टाकून ते तडतडल्यावर कांदा टाकून गुलाबी होईपर्यंत परतावे.
- मग त्यात टोमॅटो आणि हळद,मीठ टाकून परतावे.
- नंतर लाल तिखट, घरगुती मसाला घालून २ मिनिटे परतावे.
- नंतर अर्धी वाटी पाणी ओतावे.
- २ ते ३ मिनिटे झाकण लावून मंद आचेवर ठेवावे. नंतर गॅस बंद करावा
- आपली कुरडईची सुकी भाजी तयार आहेत.
सूचना: -
- तिखट आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकावे

0 टिप्पण्या