हेडमसाज
जीवनातील अतिरिक्त ताणतणावांमुळे डोके शांत राहत नाही आणि डोके दुखते. तसेच धकाधकीच्या जीवनात केसांवर वेळ द्यायला जमत नाही परिणामी केस गळू लागतात. यासाठी आठवड्यातून एकदा केसांना तेल लावून हेडमसाज केल्याने या तक्रारी कमी होतात. आज आपण पाहुयात हेडमसाज कशाप्रकारे करावा.
साहित्य
- ऑइल (खोबरेल तेल, जास्वदीं तेल, ऑलिव्ह ऑइल )
- कापूस
कृती:-
- प्रथम कुठलेही एक तेल वाटीमध्ये घेऊन कोमट करावे.
- कापसाने तेल केसांच्या भांगात लावून घ्यावे.
- नंतर बोटांनी तेल पसरवून घ्यावे.
- प्रथम आडव्या रेषेत मसाज करावा.
- मध्यभागापासून सुरुवात करून कानापर्यंत गोलाकार डोक्याला थोडा दाब देऊन मसाज १० मिनिटे करावा. डोके हालले पाहिजे.
- यानंतर दोन्ही हातांचे अंगठे एकमेकांमध्ये लॉक करून (नमस्कारची मुद्रा )हळूहळू पंचिंग करावे.
- मग पुन्हा हळुवार मसाज करावा जेणेकरून केसांच्या उत्तेजित पेशी शांत होतील.
- मग भुवयांच्या मसाज करावा त्यासाठी प्रथम अंगठ्याला तेल लावून अंगठा आणि पहिल्या बोटाची चिमटी तयार करून भुवया डोळ्यापासून कानाच्या दिशेने हळुवार दाबाव्यात.
- नंतर केसांना वाफ द्यावी
केसांना वाफ घेणे
वाफ घेण्यासाठी प्रथम केसांचा अंबाडा बांधावा.
मग एका पसरत भांड्यात पाणी गरम करावे. त्यात एक नॅपकिन बुडवून घट्ट पिळून घ्यावा.
नॅपकिन केसांवर चारही बाजूनी व्यवस्थित गुंडाळावा.
नॅपकिन थोडा थोडा दाबावा.
दहा मिनिटांनी नॅपकिन काढून केस सुकवावे.
सूचना: -
- तेल किती गरम हवे ते पाहावे.
- आपल्याला सहन होईल तेवढाच दाब द्यावा.
- वाफ घेताना पाण्याचे तापमान तपासावे.

0 टिप्पण्या