Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

घरगुती फ्रुट फेशिअल | Homemade Fruits Facial

 घरगुती फ्रुट फेशिअल



साहित्य 

  • कोरफडीचा गर १ चमचा 
  • पपई २ चमचे
  • आंबा रस , कलिंगड  रस , संत्रा रस (कुठलेही एक त्वचेच्या प्रकारानुसार ) ५ चमचे 
  • संत्रा पावडर २ चमचे 
  • ज्वारीचे किंवा तांदळाचे पीठ ४ चमचे 
  • हळद २ चमचे 
  • मध १ चमचा 
  • गुलाबपाणी  ३ चमचे 

 

कृती:-

प्रथम पूर्वतयारी करावी ( केस बांधून त्यावर फेशिअल बेल्ट लावावा, ऍप्रन घालावे. )

क्लिंझिंग - कोरफडीच्या गराने ५ मिनिटे क्लिंझिंग करावे. 

स्टीम - स्टीम घेताना पाण्यात संत्रा पावडर टाकावी . ७ ते ८ मिनिटे स्टीम घ्यावी. 

स्क्रबिंग - तेलकट त्वचेसाठी ज्वारीच्या आणि बाकीच्यांसाठी  तांदळाच्या पीठाने स्क्रब करावे. नंतर चेहरा साध्या पाण्याने धुवून घ्यावा. 

मसाज - मसाज करताना गळ्याकडून वरील बाजूस करावा हनुवटीपासून गालाकडे -कानाकडे गोलाकार बोटे फिरवावी . आता दोन्ही बोटावर रस घेऊन नाकावर आणि डोळ्याच्या खाली हळुवार मसाज करावा. १५ ते २० मिनिटे करावे. 
कोरड्या त्वचेसाठी - कलिगडचा रस . 
तेलकट त्वचेसाठी -संत्रा रस.  
सावळ्या किंवा माध्यम त्वचेसाठी - आंब्याचा रस + हळद. 
मसाज झाल्यावर चेहरा न धुता फेसपॅक लावावा. 

फेसपॅक -फेसपॅक लावल्यावर चेहऱ्याची जास्त हालचाल करू नये. 
कोरड्या त्वचेसाठी -  संत्र्याचा रस + मध एकत्र करून लावावे. १० मिनिटांनी धुवावे. 
तेलकट त्वचेसाठी -  पिकलेल्या पपईचा गर २ चमचे काढून तो थोडासा पातळ करून चेहऱ्यावर लावावा २० मिनिटांनी धुवावे. 
सावळ्या किंवा माध्यम त्वचेसाठी - आंब्याचा रस +हळद (उन्हाळ्यात ) इतरवेळी मसूर डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेऊन सकाळी बारीक वाटावी. त्यात १/२ चमचा हळद टाकून हा लेप चेहऱ्यास लावावा. ते वाळल्यावर धुवावे. 
 

सूचना: - 

  • जर पातेल्यात स्टीम घेणार असल्यास डोळे बंद ठेवावे. 
  • फेसपॅक किंवा मसाज क्रिम डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या