घरगुती फेसपॅक
पिकलेल्या पपईचा गर २ चमचे काढून तो थोडासा पातळ करून चेहऱ्यावर लावावा. तेलकट चेहऱ्यावर हा जास्त गुणकारी आहे.
आंबेहळद ,जायफळ दुधात उगाळून, मध, आणि लिंबाचा रस हे सर्व समप्रमाणात घेऊन चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी धुवावे.
मसूर डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेऊन सकाळी बारीक वाटावी. त्यात १/२ चमचा हळद टाकून हा लेप चेहऱ्यास लावावा. वाळल्यावर धुवावे.
जायफळ दुधात उगाळून लावल्यास वांग, मुरुमांचे डाग,विविध प्रकारचे व्रण नाहीसे होतात.
दही २ चमचे + लिंबू रस १/२ चमचा +१/२ चमचा मध हे लावल्यास जास्त प्रमाणात पिंपल्स येण्यावर प्रतिबंध करतो.
कोरड्या त्वचेसाठी अंड्यातील पिवळा बलक आणि बेसन पीठ २ चमचे एकत्र करून लावावे. ५ मिनिटांनी धुवावे.
तेलकट त्वचेसाठी अंड्यातील पांढरा बलक आणि बेसन पीठ २ चमचे एकत्र करून लावावे. सुकल्यावर धुवावे.
उष्णेतेने आलेल्या मुरुमांवर चंदन दुधात उगाळून लावावे.
काळपटपणासाठी टोमॅटोचा रस लावावा. त्याने चेहरा उजळतो.
डाळीचे पीठ , लिंबू रस,हळद आणि दुधाची साई एकत्र करून लावावी.
काकडीचा रस +टोमॅटोचा रस+ग्लिसरीन+गुलाबपाणी समप्रमाणात घेऊन चेहऱ्यास आणि मानेला लावल्यास नवीन चमक येते.
गुलाबपाणी , चंदन पावडर १ चमचा आणि मुलतानी माती २ चमचे एकत्र पेस्ट करून लावल्यास चेहरा सॉफ्ट होतो.
संत्र्याची वाळलेली साले आणि अक्रोडची टरफले एकत्र किंवा वेगवेगळी जाडसर वाटून स्क्रब करायला वापरा.
चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी कांद्याचा रस १ महिना रोज लावल्याने फरक पडेल.
मेहेंदीची पाने वाटून त्यात हळद आणि दूध एकत्र करून लेप लावल्यास मुरुमांचे डाग नष्ट होतात.
तुळशीची पाने , कडुलिंबाची पाने, पुदिन्याची पाने वाटून त्यात हळद आणि गुलाबपाणी टाकून फेसपॅक लावावा.

0 टिप्पण्या