केसांच्या तक्रारी आणि घरगुती उपाय
केस गळणे
केस गळण्याची अनेक करणे आहेत . मानसिक ताण, गंभीर आजार,बाळंतपण ,व्यवस्थित झोप न घेणे. योग्य शाम्पूचा वापर न करणे , केस स्वछ न ठेवणे. केस खूप घट्ट बंधने ,भरपूर क्लिप्सचा वापर करणे. यामुळे केस कुमकुवत होतात परिणामी ते गळू लागतात.योग्य शाम्पूचा वापर न करणे , केस स्वछ न ठेवणे. केस खूप घट्ट बंधने ,भरपूर क्लिप्सचा वापर करणे. यामुळे केस कुमकुवत होतात परिणामी ते गळू लागतात.
तसेच व्यायाम केल्यामुळे अंगातून खूप घाम येतो. त्यामुळे उष्णता बाहेर पडते. आणि वजन कमी करण्याच्या अट्टहासामुळे आहारातील तेल व तूप यांचे प्रमाण कमी करतात. परिणामी केसांमध्ये आणि शरीरात उष्णता वाढते. त्यामुळे केस गळू लागतात.
उपाय -
- केसांना दोन दोन दिवसांनी ऑलिव्ह ऑइल किंवा जास्वंद तेलाने मसाज करावा
- केस धुण्यासाठी शिकेकाई,रिठा,केशिका या आयुर्वेदिक द्रव्यांचा उपयोग करावा.
- सकाळी आवळा पाण्यात भिजून ठेवावा. रात्री वाटून केसांत लावावे. एक तासाने कापडाने पुसून घ्यावे. सकाळी पाण्याने धुवावे.
- एक वाटी आंबट दही , चार चमचे त्रिफळा चूर्ण ,अर्धा लिंबाचा रस हे सर्व एकत्र करून रात्रभर ठेवा सकाळी केसांना लावावे. एक दोन तासांनी धुवावे.
कोंडा होणे
केसांकडे लक्ष दिले नाही तर त्यात भुश्याप्रमाणे कण दिसू लागतात. यालाच कोंडा म्हणतात. यात दोन प्रकार आढळतात.
कोरडा कोंडा - केसांमध्ये घाण असणे , निगा न राखणे हेच कोंड्याचे मुख्य कारण आहे. त्वचेवर कोंड्याचा ठार साचल्यामुळे केशनलिकापर्यंत हवा पोहचू शकत नाही व तेथे फंगस म्हणजेच बुरशी होते. केसांची मुळे कोरडी पडतात.
उपाय
- ऑलिव्ह ऑईलने नियमित मसाज करावा, तेल रात्रभर केसांमध्ये ठेवावे सकाळी केस धुवावे.
- दिवसातून दोन तीन वेळा केस ब्रशने विंचरावे , विंचरताना स्किनवर जोर देऊ नये.
- आहारात तेलकट पदार्थांचा वापर करावा.
- आवळा आणि शिकेकाईने केस धुतल्याने केसातला कोंडा नष्ट होतो.
- आठवड्यातून एकदा एक वाटी दही आणि काळी मिरीची पूड मिसळावी हे लावून २ तास ठेवावे नंतर धुवावे.
तेलकट कोंडा - तेलकट केसमध्ये अशाप्रकारचा कोंडा आढळतो. त्यामुळे डोक्यात खाज सुटते. त्यामुळे केस गळणे,पिंपल्स येणे याचे प्रमाण वाढते.
उपाय
- केस लेमन शाम्पूने धुवावे.
- केसांमध्ये व्हिनेगर,लिंबाचा रस याप्रकरातील कंडिशनर वापरावे.
- अर्धा कप लिंबाचा रस आणि थोडी साखर मिसळून केसांना लावावे. ५ तासांनी धुवावे.
- रात्री जैतुन तेल लावून सकाळी लिंबाचा रस डोक्याला चोळून नंतर केस पाण्याने धुवावे.
केसांना फाटे फुटणे
केसांच्या मुळांमधून पोषण केशनलिकांपर्यंत पोहोचले नाही तर केसांना दोन टोके फुटतात. यालाच फाटे फुटणे असे म्हणतात. अशा केसांची वाढ खुंटते. किंवा मंद होते. केस रखरखीत आणि कोरडे होतात. याखेरीज केस वळवण्यासाठी सतत ड्रायरचा वापर करणे , कमी दर्जाचा शॅम्पू वापरणे, उन्हात फिरणे ,केस विंचरताना खूप ओढणे , खूप ताणून पोनीटेल बंधने यासर्व कारणांमुळे फाट्यांचे प्रमाण वाढते. यासाठी एकदातरी पार्लरमध्ये जाऊन फाटे काढून घेणे आवश्यक आहे.
उपाय
- केस नियमित स्ट्रीम करावेत नाहीतर रोग त्वचेपर्यंत पोहोचतो
- नेहमी केस सुकवताना ड्रायर वापरू नये . कोवळ्या सूर्यप्रकाशात केस वाळवावे.
- केसांना नियमित तेल लावावे.
केसांत उवा होणे
केसांची योग्य ती निगा न राखल्यास केसांमध्ये उवा होतात. यामुळे केसांना खाज सुटते. शालेय वयातील मुलींमध्ये याचे प्रमाण जास्त असते. केसांमध्ये सतत खाजवल्याने अभ्यासात लक्ष लागत नाही. यावर प्रतिबंधात्मक शाम्पूचा वापर करावा
उपाय
- कडुलिंबाची पाने वाटून केसांना लावावी
- ५० ते ६० तुळशीची पाने १ लिटर पाण्यात उकळत ठेवावी.२५० एम. एल. झाल्यावर थंड करून त्याने केस धुवावे.
- कांद्याचा रस आणि दही एकत्र करून १ तास केसांना लावून ठेवावे. नंन्तर धुवावे.
- लिंबू रस आणि आल्याचा रस एकत्रकरून भांगामध्ये लावावे.
- सीताफळाच्या बिया वाटून लावल्याने उवा कमी होतात.
टक्कल पडणे
वयानुसार आणि प्रदूषणामुळे केस गळून गळून मग टक्कल पडते. वेळीच उपचार न केल्यास संपूर्ण डोक्यावर टक्कल होते आणि मग कितीही उपचार केले तरी उपयोग होत नाही
उपाय
- २-३ लसूण पाकळ्या , काजळासोबत कुटाव्या आणि ते टक्कल पडलेल्या भागावर लावावे . आधी तूप किंवा लोणी लावून त्यावर हा लेप लावावा. असे रोज एक महिना करावे.

0 टिप्पण्या