मेहेंदी डाय
सर्वच वयातील स्री किंवा पुरुषांना आपले केस मऊ, कलरफुल आणि सतेज असावे. त्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे मेहेंदी डाय. महिन्यातून एकदातरी मेहेन्दीडाय करावा. असे केल्याने केस गळणे, त्यात कोंडा होणे, तसेच फाटे फुटणे. या समस्या येत नाहीत. तसेच ज्यांचे केस थोडे पांढरे असतील तर त्यांनी केसांना कृत्रिम कलर लावण्यापेक्षा मेहेंदीडाय करणे केव्हाही चांगले. कारण कृत्रिम कलर चे जसे इन्स्टंट फायदे आहेत त्यापेक्षा जास्त तोटेच आहेत. आणि मेहेंदी हि नेसर्गिक असल्यामुळे त्याचे तोटे काहीच नाहीत.
साहित्य
- मेहेंदी पावडर २५० ग्राम
- आवळा पावडर २ चमचे
- जास्वंद पावडर २ चमचे
- चहा पावडर २ चमचे किंवा कॉफी पावडर २ चमचे
- कात १ चमचा
- संत्रा पावडर २ चमचे
- कोरफड गर २ चमचे
- बिट गर २ चमचे
- दही एक छोटी वाटी
- अंडी २ ( हवी असल्यास )
- हायड्रोजन पॅराऑक्साईड दोन चमचे ( फक्त कलरसाठी ) बाकी जरुरी नाही.
कृती:-
- प्रथम चहा पावडर किंवा कॉफी पावडर घेऊन त्यात १ ग्लास पाणी ओतून ५ मिनिटे उकळून घ्यावे ते थंड होण्यास ठेवावे.
- एका लोखंडी भांड्यात सर्व साहित्य (अंडी व हायड्रोजन पॅराऑक्साईड सोडून बाकी)ओतावे त्यात थंड झालेले चहा किंवा कॉफीचे पाणी ओतावे. आणि व्यवस्थित मिक्स करून १० ते १४ तास भिजत ठेवावे.
- मध्ये मध्ये दोन तीन वेळा हलवून परत भिजत ठेवावे.
- मेहेंदी लावायच्या आधी प्रथम अंडी व हायड्रोजन पॅराऑक्साईड मेहेंदीमध्ये एकत्र करून फेटून घ्यावे.
- मग लगेच माथ्यावरील केस घेऊन वरून खालच्या दिशेने आणि डोक्याच्या स्किनलाही मेहेंदी लावावी.
- मेहेंदी लावलेली बट गोलाकार घेऊन व्यवस्थित फिक्स करावी.
- पुढील सर्व बट एकाच दिशेने गोलाकार पद्धतीने एकमेकांवर घेत मेहेंदी लावत फिक्स करावी.
- अशाप्रकारे सर्व केसांना आणि डोक्याच्या स्किनला मेहेंदी लावून घ्यावी.
- मेहेंदी पूर्ण लावल्यावर डोके एखाद्या पागडीप्रमाणे दिसते.
- नंतर त्यावर प्लास्टिक कॅप लावावी.
- मेहेंदी ३ ते ४ तास तशीच ठेऊन मग साध्या पाण्याने व्यवस्थित धुऊन घ्यावी.
सूचना: -
- मेहेंदी लावण्याआधी केस स्वछ धुऊन घ्यावे. केसात तेल नसावे.
- मेहेंदी लावताना हातात हॅन्डग्लोस घालावे.
- केसातील सर्व गुंता आधी काढून घ्यावा.
- मेहेंदी धुतल्यावर दोन दिवस केसांना भरपूर तेल लावावे. नंतर शाम्पूने केस धुवावे.

0 टिप्पण्या