केसांचे प्रकार - परिणाम आणि उपाय
कोरडे केस (Dry Hairs)
या केसामध्ये तेलग्रंथी अल्पप्रमाणात तयार होतात असतात. वाढत्या वयानुसार केशवर्धक द्रव्यनिर्मितीचे प्रमाण मंदावल्याने केस कोरडे पडतात. तसेच सतत उन्हात फिरणे , कंडिशनवरचा वापर न करणे यामुळेही केस कोरडे पडतात. कोरडे केस हे जाड असतात. यात फाटे लवकर फुटतात. या केसांची मुळे घट्ट असतात मात्र ते जास्त ठिसूळ असतात. त्यामुळे ते मधेच तुटतात. लवकर कोंडा होतो. नेहमी विस्कटल्यासारखे दिसतात. लवकर गुंता होतो. या प्रकारच्या केसांना चमक नसते ते साधारणतः भुरकट तपकिरी रंगाचे असतात. यात फाट्यांचे प्रमाण जास्त प्रमाणात असतात. हे केस एकमेकांपासून सहजपणे वेगळे होतात. स्पर्शाला ते चरचरीत असतात. हे केस कुरळे असू शकतात.
- कोरडे केस आठवड्यातून किमान दोनदा धुतले पाहिजेत.
- केस धुण्याआधी एक दिवस कोमट तेल लावून हेडमसाज करावा . त्यामुळे केसांच्या मुळांना तेल मिळते आणि कोरड्या पेशीनिर्मितीची क्रिया खुंटते.
- केस धुताना सौम्य शॅम्पूचा वापर करावा.
- केस धुताना प्रत्येकवेळी कंडिशनर लावावे.
- मेहेंदी डाय महिन्यातून एकदाच करावे. कारण मेहेन्दी डाय केल्याने केस कोरडे होतात. नंतर २ दिवस केसांना भरपूर तेल लावावे.
तेलकट केस (Oily Hairs)
- तेलकट केस आठवड्यातून किमान चारवेळा धुतले पाहिजेत.
- केस लेमन शाम्पूने धुवावे.
- तेलकट , तळलेले , चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळावे.
- केस धुताना प्रत्येकवेळी कंडिशनर लावावे.
- केसांमध्ये खूप तेल लावू नये .
- केस धुण्यापूर्वी एक तास अगोदर हेड मसाज करावा.
मिश्र केस (Combination Hairs)
मिश्र केस हे तेलकट आणि कोरडे या दोन्ही प्रकारात आढळतात. केसांना शॅम्पू केल्यानंतर २ दिवस कोरडे असतात आणि नंतर ते तेलकट होतात. केसांना शॅम्पू केल्यानंतर लगेच मऊ लागतात २ दिवसांनी चरचरीत लागतात. तीव्र शाम्पूने धुतल्यास केसांची टोके खराब होतात. आणि जास्त प्रमाणात फाटे फुटतात. केसांची योग्य काळजी न घेणे. संतुलित आहार न घेणे.प्रखर उन्हात जाणे यामुळे या प्रकारातील केस लवकर खराब होतात.
उपाय -
- केस धुताना शॅम्पू आणि पाणी एकत्र करून लावावे.
- नियमित कंडिशनर वापरावे.
- १५-२० दिवसांनी मेहेंदी लावावी मेहेंदी डाय करताना त्यात अंडी एकत्र करावी.
- केस आठवड्यातून किमान तीनवेळा धुतले पाहिजेत.
- केस धुण्यापूर्वी ५ तास अगोदर हेड मसाज करावा.
- प्रखर सूर्यकिरणे केसांवर पडू नयेत याची काळजी घ्यावी.
सर्वसाधारण केस (General Hairs)
- केस आठवड्यातून किमान तीनवेळा धुतले पाहिजेत.
- केस धुताना सौम्य शॅम्पू आणिकंडिशनर वापरावे.

0 टिप्पण्या