फेशिअलचे प्रकार
हवेत होणारे प्रदूषण आणि धकाधकीचे जीवन , मानसिक ताण यामुळे चेहऱ्याची त्वचा निस्तेज आणि काळपट होते.सुंदर दिसण्याचा अधिकार सर्वच वयातील स्त्रियांचा आहे. परंतु जसे वय वाढेल तसे स्वतःचे दुर्लक्ष होते. आणि ज्या वयात खऱ्या अर्थाने त्वचेला व्हिटॅमिन प्रोटीन आणि काळजी घेण्याची गरज असते तेव्हाच आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. अलीकडे बऱ्याच स्त्रिया , मुली सौन्दर्याच्या बाबतीत जागरूक असल्याचे दिसते.
२५-३० वयातील स्त्रियांनी महिन्यातून एकदा फेशिअल करावे.
३०-३५ वयातील स्त्रियांनी प्रत्येक २० दिवसांनी फेशिअल करावे.
४०-४५ वयातील स्त्रियांनी प्रत्येक १५ दिवसांनी फेशिअल करावे.
फेशिअलचे विविध प्रकार आहेत बाजारात विविध कंपन्या हे प्रॉडक्ट विकतात. त्यातील प्रकार आपण पाहूया आणि त्याचे फायदे लक्षात घेऊ
गोल्ड फेशिअल-
हे फेशिअल साधारणतः नववधू साठी करतात. याचे परिणाम म्हणजे इफेक्ट लगेच होतो. हे जास्तकरून गोऱ्या त्वचेवर सूट होते. याने चेहऱ्यावर लवकर ग्लो येतो. नावाप्रमाणे सोनेरी रंग येतो
सिल्वर फेशिअल
याने चेहऱ्यावर ग्लो तर येतोच शिवाय त्वचेतील सावळेपणा जाऊन स्किन गोरी दिसते पूर्वीच्या काळी लोक चांदीच्या ताटात जेवण करायचे त्यामुळे त्याचे अर्क पोटात जाऊन चेहरा सुंदर आणि चमकदार दिसायचा. याचाच विचार करून सिल्वर फेशिअलचा जन्म झाला हे फेशिअल केल्याने चेहरा सुंदर आणि चमकदार होतो
वाईन फेशिअल
यामध्ये भरपूर प्रमाणात क जीवनसत्व असते.
डायमंड फेशिअल
चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि पिंपल्स कमी करते. हे जास्तकरून गोऱ्या आणि सावल्या त्वचेवर सूट होते. याचे खूप फायदे आहेत.त्वचा हिऱ्याप्रमाणे चमकते
ऍक्ने फेशिअल
चेहऱ्यावर जर खूप पुरळ ,पिंपल्स आले असतील तर या फेशिअलचा उपयोग होतो.
हे फेशिअल नियमित केलयास पुरळ ,पिंपल्स कायमचा बंदोबस्त होऊन जातो.
पर्ल फेशिअल
हे फेशिअल केल्याने चेहरा मोत्याप्रमाणे चमकतो.याने रंग गोरा होतो .
अँटी एजिंग फेशिअल
या फेशिअल मध्ये वाढलेले वय कमी दिसते पुढेही याचा फायदा होतो हे जास्तकरून ३५ वर्षानंतर वापरू शकतो. याचा खूपच फायदा होतो
डिव्हाईन फेशिअल -
हे फेशिअल महिलांमध्ये असलेला थकवा आणि निराशा घालवतो दीड तासांचे फेशिअल असते त्यात मसाजला जास्त महत्व आहे.
फ्रुट फेशिअल
यामध्ये चेहऱ्याच्या प्रकारानुसार फ्रुटस चे अर्क वापरून तयार केलेले फेशिअल किट असते. त्याचा साईड इफेक्ट काहीच होत नाही
चॉकलेट फेशिअल
ह्या फेशिअलचा सुगंध चोकल्टप्रमाणे असतो आणि ह्याने थकवा जातो त्यामुळे बऱ्याच महिला ह्याचे फेशिअल करण्याला पसंती देतात ह्यात कोको पावडर , जैतुन तेल , ब्राउन शुगर वापरलेले असते.
हर्बल फेशिअल
निसर्गात तयार होणारे हर्ब्स वापरून म्हणजेच शेतात , वनात उगवणाऱ्या वनस्पतीपासून हर्बल फेशिअलचे किट तयार केले जाते. याचे सध्या मार्केटमध्ये अरोमा आणि एलोवेरा हे प्रकार जास्त प्रमाणात वापरात आहेत आणि त्याला खूप मागणी आहे. कारण यांचे साईड इफेक्ट होत नाही .
टॅन फेशिअल
प्रखर सूर्यकिरणांमध्ये सतत वावरल्यामुळे चेहऱ्याची स्किन काळवंडते. यासाठी बाजारात खास टॅन फेशिअल उपलब्ध आहेत. ऑईली स्किन साठी हे जास्त उपयुक्त ठरते. तसेच सावल्या त्वचेत होणारे मेलॅनिन निर्मितीचे प्रमाण कमी करते.
महत्वाच्या टिप्स
फेशिअल केल्यानंतर केमिकल म्हणजेच साबण २ दिवस वापरू नये.
फेशिअल नंतर २ ते ४ दिवस प्रखर उन्हात जाण्याचे टाळावे.

0 टिप्पण्या