स्पेशल अंडाकरी मसाला
कोर्स: ब्रेकफास्ट / डिनर / लंच पाककृती: महाराष्ट्र तयारीची वेळ: १५ मिनिटे कूक वेळः १० मिनिटे एकूण वेळ: २५ मिनिटे सर्व्हिंग्ज: ४ सर्व्हिंग्ज
साहित्य: -
- ६ अंडी उकडून सोलून घ्यावे.
- छोटी वाटी सुके खोबरे खिसलेले
- १ चमचा घरगुती कांदा लसूण मसाला
- १ चमचा मीठ
- १/२ चमचा हळद
- १ चमचा लाल तिखट
- १ चमचा धने पूड
- १ चमचा जिरे पूड
- १ चमचा आले लसूण पेस्ट
- १ वाटी तेल
- १/२ चमचा मोहरी
- १/२ चमचा जिरे
- १ कांदा
- १ लाल टोमॅटो उकडून घ्यावे
- १ लिंबू
- १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती :-
- टोमॅटोच्या साली काढून मिक्सरवर बारीक प्युरी करावी.
- कांदा अख्खा सालीसकट डायरेक्ट गॅसवर भाजावा. त्याचप्रकारे खोबऱ्याची वाटी भाजावी. गार झाल्यावर कापून बारीक पेस्ट करावी.
- एका कढईत तेल गरम करण्यास ठेवावे त्यात सोललेली अंडी टाकून ब्राऊन होईपर्यंत सर्व बाजूनी तळावे
- अंडी काढून घ्यावी आणि त्याच कढईत मोहरी - जिरे टाकावे.
- आले लसूण पेस्ट टाकावी आणि परतून घ्यावे.
- नंतर टोमॅटो प्युरी टाकावी. २ -३ मिनिटे परतावे.
- त्यात हळद, लाल तिखट, धने पूड, जिरे पूड आणि कांदा लसूण मसाला टाकून परतावे.
- नंतर त्यात कांदा खोबरे पेस्ट टाकून तेल सुटेपर्यंत परतावे.
- मग त्यात चवीनुसार मीठ टाकावे. छान परतावे.
- कोमट पाणी १ १/२ ग्लास किंवा गरजेनुसार ओतावे.
- अंडी दोन तुकडे करून घ्यावे. आणि रश्श्यात टाकावे.
- ५ ते ७ मिनिटे उकळावे
- कढईवर झाकण ठेऊन गॅस बंद करावा.
सूचना: -
- तिखट आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकावे
- स्पेशल अंडाकरी मसाला तयार आहे.
0 टिप्पण्या