Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

दत्त जयंती कथा

दत्त जयंती कथा 

            संपूर्ण महाराष्ट्राचे गुरुस्वरूप आराध्यदैवत असलेले श्री दत्तात्रय यांची जयंती मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. त्यांना एकाच देह असून तीन मात्र तोंडे तीन होती. तसेच सहा हात आणि दोन पाय होते. त्यांचे वास्तव्य कायम वनातच असे. त्यांच्या जवळ कामधेनू गाय आणि पायापाशी चार श्वान नेहमी असत. ह्याच रूपात त्यांची पूजा केली जाते. त्यांच्या केवळ स्मरणाने किंवा फोटोस्वरूप दर्शनाने भाविकांना जगण्याची योग्य दिशा मिळते. 

            त्यांच्या जन्माची कथा आज आपण माहित करून घेणार आहोत. अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनसूया यांना मुलबाळ नव्हते. त्यामुळे अत्री ऋषींनी ब्रह्मा , विष्णू आणि महेश यांची घोर तपश्चर्या  केली.  आणि त्यांची पत्नी अनसूया हिची पतिव्रता आणि सती ची ख्याती होती. त्यामुळे ब्रह्मा , विष्णू आणि महादेव या देवतांच्या पत्नी देवी सरस्वती ,देवी पार्वती, देवी लक्ष्मी यांनी आपापल्या पतीकडे तिची परीक्षा घेण्याची मागणी केली. 

       मग ब्रह्मा , विष्णू आणि महादेव हे तिघे देवता ऋषी - भिक्षुकांचे रूप धारण करून अनुसूयेची परीक्षा घेण्यासाठी अत्री ऋषींच्या आश्रमात आले. आणि देवी अनसूयेकडे अर्धवस्त्र होऊन भिक्षा म्हणून तिचे अंगावरील दूध पाजण्यास सांगितले. हे ऐकल्यावर देवी अनुसया प्रथम विचारात पडली कि एकतर भिक्षुक खाली हात परत जायला नको आणि दुसरे ती समजून गेली कि हे कोणी साधारण याचक नाही आहेत नक्कीच देवांपैकीच कोणी आपली परीक्षा  घायला आले आहेत . 

            मग देवी अनुसूयेने आपल्या उपासनेच्या शक्तीने त्या तिघा भिक्षकांना छोटी बाळे बनवले आणि त्यांना स्वतःचे दूध पाजले आणि त्यांना झोपवले. इकडे तिन्ही देव खूप वेळ झाला तरी परत न आल्याने देवी सरस्वती ,देवी पार्वती, देवी लक्ष्मी या अत्री ऋषींच्या आश्रमात येतात आणि आपले पती छोटी बाळे झालेली पाहतात. त्या तिघी देवी अनुसूयेकडे आपल्या पतींना पूर्ववत करण्याची विनंती करतात. त्यानुसार अनुसूया विशेष मंत्र म्हणून बाळांचे रूप पाहिल्यासारखे करतात. 

        अनुसूयेच्या पातिव्रतेवर आणि चातुर्यावर ब्रह्मा , विष्णू आणि महादेवप्रसन्न होतात आणि तिला वर मागण्यास सांगतात. तेव्हा अनुसूया त्यांना म्हणते कि तुम्ही तिघे देवता माझे पुत्र म्हणून जन्माला यावे हीच माझी इच्छा आहे. देवांनी तथास्तु म्हंटले आणि त्यानंतर मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमा या दिवशी दत्तात्रय, सोम आणि दुर्वास यांचा जन्म झाला. ते अनुक्रमे विष्णू,ब्रह्मा आणि महादेव यांचे अवतार होते असे मानले जाते. त्यांना गुरु म्हणून भाविक मानतात. भारतामध्ये त्यांनी खूप भ्रमण केले आणि आपली स्थाने निर्माण केली.

         भारतामध्ये खासकरून महाराष्ट्रामध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भाविक उपवास करतात. आणि गुरूचा वरदहस्त आपल्यावर कायम राहावा यासाठी प्रार्थना करतात.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या