Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

खोबऱ्याची ओली चटणी ( Coconut Chutney)

 खोबऱ्याची ओली चटणी 

कोर्स:  ब्रेकफास्ट 

पाककृती: भारतीय 

 तयारीची वेळ:  १0 मिनिटे

 कूक वेळ:  ५ मिनिटे

 एकूण वेळः  १५ मिनिट

 सर्व्हिंग्ज:  ४ सर्व्हिंग्ज


साहित्य: -

  • अर्धी वाटी ओले खोबरे 
  • ५ ते ६ हिरव्या मिरच्या 
  • १/२ वाटी कोथिंबीर 
  • १० ते १२ लसूण पाकळ्या 
  • २ चमचे उडीद डाळ 
  • १/२ चमचा मीठ 
  • १/२ चमचा साखर 
  • १/२ चमचा जीरे 
  • १/२ चमचा मोहरी 
  • फोडणीसाठी तेल 
  • १० ते १२ कडिपत्याची पाने 

कृती :-

  • खोबऱ्याचे कप करून घ्यावे . कोथिंबीर निवडून धुऊन घ्यावी. मिरची, लसूण धुऊन घ्यावे . 
  • हे सर्व एकत्र करून मिक्सरवर बारीक वाटून घ्यावे . 
  • एका लहान कढईत तेल तापवून त्यात उडीद डाळ टाकावी. 
  • नंतर मोहरी,जिरे टाकावे. 
  • मग त्यात कढीपत्ता टाकावा. मीठ आणि साखर टाकावी. 
  • त्यात वाटलेले वाटण ओतावे . थोडे पाणी ओतून व्यवस्थित एकजीव करावे. 
  • खोबऱ्याची चटणी तयार आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या