Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

त्वचेचे परीक्षण किंवा प्रकार | Types of Skin

 


त्वचेचे परीक्षण किंवा प्रकार 

                फेशिअल केल्यामुळे अनेक फायदे होतात . परंतु त्यासाठी त्वचेची पोत ,प्रकार माहित असणे फार आवश्यक आहे. म्हणजे कुठलीही ट्रीटमेंट देताना किंवा घेताना चटकन लक्षात येते. त्यानुसार क्रीमचा वापर चटकन करता येईल. 

                त्वचेचे परीक्षण करण्यासाठी रात्री चेहरा साबणाने स्वछ धुवून टॉवेलने हळुवार कोरडा करावा. कुठल्याही प्रकारचे क्रीम ,पावडर लावू नये. सकाळी उठल्यावर चेहरा आरश्यात पाहावा आणि टिशू पेपरने चेक करावा. 


खाली त्वचेचे प्रकार दिले आहेत त्यानुसार निरीक्षण करावे. 

कोरडी त्वचा -

चेहरा आरश्यात पाहिल्यास तेलकट दिसत नाही. तसेच टिशू पेपरने चेहरा पुसल्यास त्यावर तेलकट डाग पडत नाही. हि कोरडी त्वचा समजावी. या त्वचेवर सुरकुत्या लवकर पडतात. कोरड्या त्वचेला ओलावा आणि तेलकटपणाची गरज असते म्हणून योग्य त्या क्रिमचा वापर करणे गरजेचे आहे. कोरड्या त्वचेसाठी बदामाचे तेल सवोत्तम आहे. यासाठी तेलयुक्त साबणाने स्नान करणे फायद्याचे ठरते आठवड्यातून एकदा क्लिंझिंग मिल्कने मसाज करावा. आठवड्यातून चार वेळा कलींगड किंवा टरबूजचा रस लावावा. 


तेलकट त्वचा -

चेहरा आरश्यात पाहिल्यास संपूर्ण चेहरा तेलकट दिसतो. टिशू पेपरने चेहरा पुसल्यास नाक,गाल , हनुवटी,कपाळ यावर तेलकट थर दिसतो. हि त्वचा तेलकट समजावी. या प्रकारच्या त्वचेवर ब्लॅक आणि व्हाईट हेड्स चे प्रमाण जास्त आढळते. पिंपल्स सुद्धा जास्त येतात. यासाठी दिवसातून  ४ ते ५ वेळा चेहरा स्वछ धुवावा. यासाठी ग्लिसरीन युक्त साबण वापरावा. 


मिश्र त्वचा -

चेहरा आरश्यात पाहिल्यास त्वचेवरील काही भाग तेलकट वाटतो जसे कि नाकाच्या शेजारी , हनुवटी इत्यादी . तसेच कपाळ आणि गालावरचा भाग कोरडा वाटतो. हि त्वचा मिश्र समजावी . हि त्वचा स्पर्शाला मऊ असते. या त्वचेच्या काळजी जास्त नाही घ्यावी लागत . फक्त उन्हाळ्यात सनस्क्रिम आणि हिवाळ्यात मॉईशराइझर वापरावे. 



Woman photo created by cookie_studio - www.freepik.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या