सांभार रेसिपि
कोर्स: ब्रेकफास्ट
पाककृती: भारतीय
तयारीची वेळ: १५ मिनिटे
कूक वेळ: १५ मिनिटे
एकूण वेळः ३० मिनिट
सर्व्हिंग्ज: ४ सर्व्हिंग्ज
साहित्य: -
- तूर डाळ १ कप
- १ टोमॅटो
- १ कांदा
- १/२ वाटी तेल
- १/२ चमचा मीठ
- २ चमचे कोथिंबीर
- १/२ चमचा लाल तिखट
- १/२ चमचा सांभार मसाला
- १ चमचा चिंच
- २ आमसूल
- ४ तमालपत्र
- १/२ चमचा जिरे
- १/२ चमचा मोहरी
- १ वाटी कापलेल्या मिक्स भाज्या ( दुधी भोपळा, शेवग्याच्या शेंगा , वांगे,बटाटा )आवडीप्रमाणे.
- १/२ चमचा हळद
कृती :-
- तूर डाळ धुऊन कुकरमध्ये ओतावी. त्यात १ चमचा तेल , १/४ चमचा हळद, १ कापलेला टोमॅटो , अर्धा कांदा, १/४ चमचा मीठ टाकून नरम शिजवून घ्यावी.
- चिरलेल्या भाज्या धुऊन कुकरमध्ये १ शिटी द्यावी.
- शिजवलेली डाळ रवीने चांगली घोटून घ्यावी.
- कढईत तेल गरम करून त्यात तमालपत्र , मोहरी जिरे टाकावे. ते तडतडल्यावर त्यात अर्धा कांदा टाकून गुलाबी होईपर्यंत परतावे.
- नंतर त्यात चिंच,आमसूल लाल तिखट , हळद, आणि मीठ टाकून परतून घ्यावे.
- त्यात घोटलेली डाळ आणि भाज्या टाकाव्या.
- एक ग्लास कोमट पाणी ओतावे .
- व्यवस्थित हलवून घ्यावे. उकळी येऊ द्यावी.
- मग सांभार मसाला टाकावा . एकजीव करून गॅस बंद करावा आणि त्यावर लगेच झाकण ठेवावे . म्हणजे त्याचा सुगंध जाणार नाही . आणि ते थंड होणार नाही .
- गरम गरम सांभार तयार आहे.
चिरलेल्या भाज्या धुऊन कुकरमध्ये १ शिटी द्यावी.
शिजवलेली डाळ रवीने चांगली घोटून घ्यावी.
कढईत तेल गरम करून त्यात तमालपत्र , मोहरी जिरे टाकावे. ते तडतडल्यावर त्यात अर्धा कांदा टाकून गुलाबी होईपर्यंत परतावे.
नंतर त्यात चिंच,आमसूल लाल तिखट , हळद, आणि मीठ टाकून परतून घ्यावे.
त्यात घोटलेली डाळ आणि भाज्या टाकाव्या.
एक ग्लास कोमट पाणी ओतावे .
व्यवस्थित हलवून घ्यावे. उकळी येऊ द्यावी.
मग सांभार मसाला टाकावा . एकजीव करून गॅस बंद करावा आणि त्यावर लगेच झाकण ठेवावे . म्हणजे त्याचा सुगंध जाणार नाही . आणि ते थंड होणार नाही .
गरम गरम सांभार तयार आहे.
0 टिप्पण्या