Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

महाराष्ट्रीय पावभाजी रेसिपी | Pavbhaji Recipe

 

महाराष्ट्रीय पावभाजी  रेसिपी



 कोर्स: ब्रेकफास्ट / डिनर / लंच
 पाककृती: महाराष्ट्र
 तयारीची वेळ:  १० मिनिटे
 कूक वेळः २० मिनिटे
 एकूण वेळ: २५ मिनिटे
 सर्व्हिंग्ज:  ४ सर्व्हिंग्ज


साहित्य: -
    • १ लादी  पाव 
    • ३ मोठे बटाटे 
    • २०० ग्राम पांढरे वाटाणे (५ ते ६ तास पाण्यात भिजत ठेवावे)
    • १ शिमला मिरची 
    • १०० ग्राम फ्लॉवर 
    • १ चमचा पावभाजी मसाला 
    • १ चमचा मीठ 
    • १/२ चमचा हळद 
    • १ चमचा लाल तिखट 
    • १ चमचा धने पूड 
    • १ चमचा जिरे पूड 
    • १ चमचा काळे मीठ 
    • १ चमचा आले लसूण पेस्ट 
    • १ वाटी तेल 
    • १/२ चमचा मोहरी 
    • १/२ चमचा जिरे 
    • २ मोठे कांदे 
    • २ ते ३ मोठे लाल टोमॅटो 
    • १ लिंबू 
    • १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर 
    • १ वाटी बटर 

कृती :-

  • प्रथम कुकरमध्ये एका डब्यात बटाटे , दुसऱ्या डब्यात वाटाणे आणि फ्लॉवर चिरून धुऊन घेऊन एकत्र , आणि तिसऱ्या डब्यात टोमॅटो धुवून मध्यम काप करून ठेवावे.  आणि ४ शिट्या घेऊन शिजवून घ्यावे.  
  • टोमॅटोच्या साली काढून मिक्सरवर बारीक प्युरी करावी. 
  • बटाटे साली काढून घ्याव्या. त्यात फ्लॉवर वाटाणे एकत्र करून व्यवस्थित स्मॅश करावे. 
  • एका कढईत तेल गरम करण्यास ठेवावे त्यात मोहरी - जिरे टाकावे. 
  • नंतर चिरलेला अर्धा कांदा आणि बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून परतावे. 
  • मग त्यात चवीनुसार साधे मीठ आणि काळे मीठ एकत्र करून टाकावे. छान परतावे. यामुळे कांदा आणि सिमला मिरची लवकर शिजेल.  
  • कांदा गुलाबी झाल्यावर त्यात आले लसूण पेस्ट टाकावी आणि परतून घ्यावे. 
  • नंतर टोमॅटो प्युरी टाकावी. २ -३ मिनिटे परतावे. 
  • त्यात हळद लाल तिखट धने पूड जिरे पूड टाकून परतावे. 
  • त्यात स्मॅश केलेल्या भाज्या ओताव्या. 
  • १/२ ग्लास कोमट पाणी ओतावे. 
  • एक उकळी आल्यावर बटर २ ते ४ चमचे आणि पावभाजी मसाला १ चमचा टाकावे. 
  • कोथिंबीर टाकून व्यवस्थित हलवावे. कढईवर झाकण ठेऊन गॅस बंद करावा. 
  • एक तवा गॅसवर ठेवावा. पाव मधून कापून आतील बाजूने त्यावर थोडे लाल तिखट आणि बटर चमच्याने पसरवावे. आणि गरम तव्यावर भाजावे. नंतर दुसऱ्या बाजूला फक्त बटर लावून भाजून घ्यावे.

 

सूचना: -
    • एका ताटात गरम पाव ठेवावे बाजूला बाकी राहिलेला थोडा कांदा, लिंबू ठेवावे. आणि वाटीत गरम भाजी काढावी आणि ताटात ठेवावी. 
    • पावभाजी तयार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या