Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

सुरळीच्या वड्या


सुरळीच्या वड्या 

 कोर्स:  ब्रेकफास्ट 

पाककृती: भारतीय 

 तयारीची वेळ:  15 मिनिटे

 कूक वेळ:  10 मिनिटे

 एकूण वेळः  २५ मिनिट

 सर्व्हिंग्ज:  ४ सर्व्हिंग्ज


साहित्य: -

  • १ वाटी बेसन 
  • १ वाटी ताक 
  • १/२ चमचा हळद 
  • १/२ चमचा मीठ 
  • १/२ चमचा मोहरी 
  • १/२ चमचा जिरे 
  • १/२ चमचा हिंग 
  • ५ ते ६ हिरव्या मिरच्या 
  • १/२ वाटी चिरलेली कोथिंबीर 
  • १/२ वाटी खोवलेले ओले खोबरे 
  • फोडणीसाठी तेल. 

कृती :-

  • प्रथम बेसन मध्ये ताक घालून थोडे हलवून १० मिनिटे झाकून ठेवावे. 
  • दहा मिनिटांनी त्यात हळद हिंग आणि मीठ टाकून व्यवस्थित फेटावे. 
  • हे मिश्रण नॉनस्टिक कढईत ओतून गॅसवर ठेवावे. 
  • सतत ढवळत राहावे. तळाला करपू देऊ नये. 
  • चमच्याने मिश्रण वरून सोडून पाहावे . पाकाप्रमाणे मिश्रण पडत असेल तर समजावे ते छान शिजले आहे . मग गॅस बंद करावा. 
  • एका ताटाला खालच्या बाजूने तेल लावावे. आणि वरील मिश्रण चमच्याने पातळ थर येईल अशाप्रकारे पसरवावे. 
  • मिरची आणि चिमूटभर मीठ एकत्र करून मिक्सरवर वाटून घ्यावी. 
  • फोडणीसाठी छोट्या कढईत तेल गरम करावे. 
  • त्यात मोहरी, जिरे टाकावे. त्यात मिरचीचे वाटण टाकावे. 
  • ते चमच्याने बेसनच्या मिश्रणावर पसरवावे. 
  • त्यावर खोबरे आणि कोथिंबीर पसरवावी. 
  • सुरीने दोन कट द्यावे . 
  • आता बाजूने सुरीच्या किंवा उलथन्याच्या साहाय्याने त्याचा रोल करून घ्यावा. 
  • आपल्या सुरळीच्या वड्या तयार आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या