ब्लिचिंग
ब्लिच करणे म्हणजे त्वचेवरील केसांचा रंग बदलणे. यामुळे त्वचेवरील केस सोनेरी होतात. आणि काळपटपणा कमी होऊन त्वचा उजळ होते. ब्लिचिंग करण्यापूर्वी ऍलर्जी टेस्ट करणे अत्यंत महत्वाचे असते. त्यासाठी आधी थोडे ब्लिच तयार करून , ज्यांना ब्लिच करायचे आहे त्यांच्या हातावर ते लावावे. १५ ते २० मिनिटांनी धुवावे. आणि मग हाताची त्वचा लाल न झाल्यास किंवा त्यावर पुरळ न आल्यास ते ब्लिच त्वचेला सूट होते आहे. असे समजावे. चेहऱ्यावर ब्लिच लावल्यावर डोळ्यावर गुलाबपाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या त्यासाठी थोडा कापूस घेऊन त्या गुलाबपाण्यात भिजवून डोळयांवर ठेवाव्या.
साहित्य -
- ब्लिचिंग क्रीम
- ऍक्टिव्हेटर
- क्लिंझिंग मिल्क
- कॉटन
- ब्लिच क्रीम ब्रश
- गुलाबपाणी
- फेशिअल बेल्ट
- मॉईशराईझर
कृती -
- सर्वात आधी केस व्यवस्थित बांधून फेशिअल बेल्ट लावावा.
- संपूर्ण चेहरा , मान , छाती , पाठ यावर क्लिंझिंग मिल्क लावून ५ मिनिटे मसाज करावा.
- नंतर कॉटनने चेहरा पुसून घ्यावा.
- ब्लिचिंग क्रीममध्ये ऍक्टिव्हेटर मिक्स करून लेप तयार करा.
- चेहऱ्यावर जास्त लव असेल किंवा त्वचा सावळी असेल तर ऍक्टिव्हेटरचे प्रमाण थोडे वाढवावे.
- फेशिअल स्ट्रोकनुसार (मानेकडून चेहऱ्याकडे या प्रमाणे ) ब्रशने ब्लिच क्रीम चेहरा, मान , छाती आणि पाठीला लावावे.
- ब्लिच लावताना डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी.
- ज्यांच्या चेहऱ्यावर लावायचे असेल त्यांनी डोळे ब्लिच लावताना बंद ठेवावे.
- शक्यतो स्वतः ब्लिच क्रीम लावू नये.
- ब्लिच क्रीम लावल्यावर मग डोळ्यावर गुलाब पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या.
- गोऱ्या त्वचेसाठी १५ मिनिटे आणि सावळ्या त्वचेसाठी २० ते २५ मिनिटे ब्लिच ठेवावे.
- मग चेहरा साध्या पाण्याने स्वछ धुवावा.
- नंतर मॉईशराईझरने ५ मिनिटे मसाज करावा.
महत्वाची सूचना -
- प्रथमच ब्लिच करत असाल तर ऍलर्जी टेस्ट करणे गरजेचे आहे.
- त्वचा जास्त जळजळत असेल , खाज येत असेल तर ब्लिच क्रीम त्वरित धुवावी.
- ब्लिचिंगची ऍलर्जी झाल्यास कॉटनमध्ये बर्फ घेऊन चेहऱ्यावर फिरवावा. किंवा मॉईशराइझर ने १०-१५ मिनिटे मसाज करावा.
परिणाम /निरीक्षण -
- त्वचेवरील केस सोनेरी रंगाचे होतात.
- चेहऱ्यावरील काळपटपणा कमी होतो.
- त्वचा जास्त तेलकट असेल तर त्यावरील तेलकटपणा कमी होतो.
- ब्लिच मध्ये अँटिसेप्टिक असल्यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते.
- निस्तेज त्वचा ब्लीचमुळे उजळून निघते.

0 टिप्पण्या