केसांची चमक वाढवण्यासाठी उपाय Glowing Hairs Treatment
केसांना चमक येण्यासाठी थोडासा कांदा आणि कोबी किसून तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवावा सकाळी त्यात दोन तीन थेम्ब अत्तर किंवा बॉडी स्प्रे टाकावा म्हणजे केसांचा वास येणार नाही. नंतर त्यात थोडे हर्बल तेल म्हणजे आवळा किंवा जोजोबा तेल टाकावे आणि ते केसांना लावावे. २०-२५ मिनिटांनी केस चांगले शाम्पूने धुवावे.
केस धुण्याच्या एक तास आधी कोरफडीचा गर केसांना लावल्यास केसांना वेगळीच चमक येते.
कोरड्या केसांना चमकदार बनवण्यासाठी एक चमचा मेहेंदी , दोन चमचे शिकेकाई पावडर ,अर्धा चमचा कस्टर्ड ऑइल आणि १/२ वाटी घट्ट दही एकत्र करून ते केसांना लावावे १ ते १/२ तासाने धुवावे
१ चमचा आवळा पावडर, १ चमचा जास्वंद पावडर,१ चमचा संत्रासाल पावडर यात एक लिंबाचा रस लागल्यास थोडे पाणी ओतून पेस्ट तयार करावी केसांना लावून १ तासाने धुवावे. हे आठवड्यातून एकदा जरूर करावे. केस चमकदार होतील.
कोरफडीचा ताजा गर काढून त्यात बेसन पीठ टाकून हे मिश्रण केसांना १ तास लावून ठेवावा आणि नंतर केस स्वछ धुवावे. केसांना चमक येईल .
आंबट दही केसांना लावल्यास केस चमकदार बनतात.

0 टिप्पण्या