हेअर स्टाईल साधी सागरवेणी Hair Style Sagar Veni
आपल्या सौन्दर्यात महत्वाचा वाटा असतो तो हेअर स्टाईलचा, त्यासाठी आपण पार्लरमध्ये जातो. परंतु नेहमीच पार्लरमध्ये जाणे होत नाही म्हणून तुम्हाला घरीच हेअरस्टाईल करणे शिकले पाहिजे. आज आपण सागरवेणी कशी घालायची हे पाहूया.
साहित्य :- लार्ज कोम्ब , टेल कोम्ब , हेअरस्प्रे, डेकोरेशनसाठी मोती आणि गजरे.
वेळ :-10 -15 मिनिटे
कृती :-
- लार्ज कोम्बने केसातील सर्व गुंता काढून घ्यावा. आणि टेल कोम्बने केस व्यवस्थित विंचरून घ्यावी .
- प्रथम माथ्यावरील केसांचा एक पेड साधी वेणीचा घालून घ्यावा आणि नंतर त्यात डाव्या आणि उजव्या बाजूचे केस ( १० ते १२ केसांची बात एकत्र )गुंफत जावे
- पेड घालताना दोन्ही बाजूचे केस समान असावेत.
- अशाचप्रकारे पूर्ण वेणी घालून घ्यावी
- बाकी राहिलेल्या खालील केसांची साधी वेणी घालून घ्यावी.
- रबर लावावा
- डेकोरेशन साठी मोती लावावे.
- खालील केसांना गजरा लावला तरी चालेल.
- नंतर थोडा हेअरस्प्रे मारावा म्हणजे केस बाहेर सुटणार नाहीत.
0 टिप्पण्या