मेनिक्युअर
मेनिक्युअर म्हणजे हातांची काळजी घेणे आणि त्यांना मसाज करणे . यात हातानं मसाज करणे , नखांना शेप देणे, नखांची स्वछता करणे इत्यादी प्रक्रिया केल्या जातात.
बऱ्याच वेळा आपले हात सतत कामात असल्यामुळे राठ आणि कोरडे पडतात. परंतु आपण चेहऱ्याच्या सौन्दर्याकडे जितके लक्ष देतो तितके हातांच्या कडे देत नाही. त्यामुळे हातांची त्वचा खराब होते . थंडीच्या दिवसात असे जास्त होते . हातांचे मॉईश्चर कमी होते त्यावर उपाय म्हणजे महिन्यातून एकदातरी मॅनिक्युअर करणे.
मेनिक्युअरचे फायदे
मॅनिक्युअर केल्यामुळे हाताना मसाज तर होतो.
याशिवाय हात स्वछ होतात, रुक्ष खरखरीत त्वचा मऊ होते.
तसेच यामुळे रक्ताभिसरण चांगले होते.
हातावर थंडीमुळे किंवा तीव्र साबणाच्या वापरामुळे जर हातावर चिरा पडल्या असतील तर मॅनिक्युअर केल्याने त्या कमी होतात.
नखे स्वछ होतात
हातांच्या कोपराची त्वचा हि फार काळवंडलेली असते त्याच राप निघतो.
काहीवेळेस हातावर काळे डाग पडलेले असतात ते हाइड्रोजन पॅरॅक्सॉईडमुळे जाण्यास मदत होते .
मॅनिक्युअर कसे करावे
प्रथम नखांवरील नेलपेंट काढून घ्यावी. नखांना आवडीचा शेप देऊन घ्यावा. त्यावर कटिकल सॉफ्टनर लावावे.
एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात शाम्पू आणि हायड्रोजन पॅरॅक्सॉइड टाकावे. त्यात हात दहा मिनिटे बुडून ठेवावे.
नंतर संपूर्ण हाताला शाम्पू लावून त्यावर प्युमिक स्टोन गोलाकार घासावा , त्यामुळे हातावरील डेड स्किन निघण्यास मदत होते.
नंतर हात स्वछ पाण्याने धुवावेत.
आता कुटिकल पुशरने नखांवरील क्युटिकल्स मागे ढकलावे. यामुळे नखे आकाराने मोठी दिसतात.
नेल ब्रशने नखे आतून हळुवार साफ करावीत.
नंतर हॅन्ड अँड बॉडी लोशन किंवा मॉईशराइझरने हातानं १५ मिनिटे मसाज करावा.
मग आवडीप्रमाणे नेलपेंट लावावी.
मेनिक्युअर करताना घ्यावयाची काळजी
जर हातावर जखम असेल किंवा काही स्किन प्रॉब्लेम असेल तर मॅनिक्युअर करु नये.
पाणी सोसेल इतपतच आणि गरजेनुसारच गरम घ्यावे.
प्युमिक स्टोन हातावर हळुवार घासावा .
क्युटिकल्स काढताना नखांच्या आत जखम होणार नाही याची काळजी घ्यावी .

0 टिप्पण्या