पेडिक्युअर
पेडिक्युअर म्हणजे पायांची नखांची काळजी आणि स्वछता करणे होय आपल्या शरीराचं सर्वात महत्वाचा तरीही सौन्दर्याच्या बाबतीत दुर्लक्षित असा अवयव म्हणजे पाय. शरीराचा सर्व भार हा पावलांनाच पेलावा लागतो. तसेच धुळीच्या आणि जमिनीच्या संपर्कात पाय सर्वात जास्त येत असतात. त्यामुळे ते खूप खराब होत असतात. त्यामुळे महिन्यातून कमीतकमी एकदा पेडिक्युअर करणे अत्यंत आवश्यक आहे.
पेडिक्युअर चे फायदे
- पायांना मसाज होतो
- रक्ताभिसरण वाढते
- पायांचा पोत सुधारतो
- पाय मऊ होतात.
- नखे स्वछ होतात
- पायांना सुरकुत्या,भेगांचे प्रमाण कमी होते.
- नखे शेपमध्ये राहतात.
- पायाचा कोरडेपणा कमी होतो.
पेडिक्युअर कसे करावे
साहित्य :- पेडिक्युअर सेट, नेलब्रश , प्युमिक स्टोन , कॉटन , स्क्रॅपर , टब , गरम पाणी,नॅपकिन , ऍसिटोन , क्युटिकल सॉफ्टनर,हायड्रोजन पॅराऑकसाइड , शाम्पु ,नेलपॉलिश,मसाज क्रीम .
कृती :-
- प्रथम नेलपेंट नेलपेंट रिमूव्हरच्या साहाय्याने काढून घ्यावी. कोमट पाणी करून ते टॅबमध्ये घ्यावे त्यात १ चमचा हायड्रोजन पॅराऑकसाइड आणि २ चमचे शाम्पू टाकावे आणि त्यात पाय दहा मिनिटे भिजत ठेवावेत.
- नंतर टाचा फूट स्क्रिपरच्या साहाय्याने घासून घ्याव्या.
- नेल ब्रशने नखे स्वछ करावी . नखांना क्युटिकल सॉफ्टनर लावावे. म्हणजे क्युटिकल्स लगेच निघते. मग नखांना शेप द्यावा. ऑरेंज स्टिकने नखे स्वछ करावी.
- त्यानंतर पायांचा मसाज करण्यास सुरुवात करावी.
- मसाज करताना पायांच्या पंजापासून सुरुवात करावी. प्रथम संपूर्ण पायांना मसाज क्रीम लावावी.
- बोटाना गोलाकार मसाज करावा. नंतर अंगठ्याने बोटांवरून हात सरळ वरती प्रेस करत न्यावा. तसेच घोट्याला गोलाकार पद्धतीने मसाज करावा.
- पायांच्या मागील बाजूस खालून वर सरळ हाताने मसाज करावा.
- त्यानंतर वरच्या बाजूला अल्टरनेट खालून वर गोलाकार पद्धतीने मसाज करावा.
- त्यानंतर पाय हातात घेऊन पावलांच्या घोटाजवळ दुसरा हात घेऊन उजव्या हाताने पाय गोलाकार फिरवावा.
- नंतर एका हाताने पायाचा पंजा पकडून दुसऱ्या हाताने बोटे अलगद ओढावीत.
- पाच मिनिटे पाय रिलॅक्स ठेवावेत नंतर कॉटनने पाय पुसावेत. नंतर नेलपेंट लावावी.
Flower photo created by valuavitaly - www.freepik.com

0 टिप्पण्या