हळदीचे फायदे - Benefits of Turmeric
सावळा रंग उजळवण्यासाठी एक चमचा काकडीचा रस काढून त्यात ५ ते ७ थेंब लिंबाचा रस आणि १/२ चमचा हळद घालून व्यवस्थित मिक्स करावे चेहऱ्याला मानेला लावा सुकल्यावर धुवा . चेहरा उजळेल.
एक चमचा हळद आणि एक चमचा मध मिसळून दिवसातून दोन तीन वेळा चाटल्यास खोकला बरा होतो.
दुधाची साई आणि हळद मिक्स करून सुरकुत्या असलेल्या भागावर लावल्यास सुरकुत्या जातात.
काटा टोचला असल्यास गूळ आणि हळद पावडर एका कापडात ठेऊन बांधलयास काटा निघून येतो.
बेसन आणि हळद मिक्स करून त्यात दुधाची साई एकत्र करून लहान बाळांना लावल्यास त्यांच्या चेहऱ्यावरील आणि शरीरावरील लव निघून जाण्यास मदत होते.
जखमांचे डाग जाण्यासाठी हळद आणि लिंबाचा रस एकत्र करून लावावा.

0 टिप्पण्या