मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करताना लागणारे साहित्य
कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी त्यातील लागणाऱ्या आयुधाचा किंवा साहित्याचा वापर आपण करतो . त्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो. जसे स्वयंपाक करताना आपल्याला गॅस, मिक्सर, पॅन, स्पून यासारख्या गोष्टी लागतात.
त्याच प्रमाणे आपले सौन्दर्य राखण्यासाठी आपल्याला पेडिक्युअर आणि मॅनिक्युअर करतो आणि ते करताना आपल्याला काही साहित्यांची गरज असते . त्याने आपले काम लवकर आणि योग्य होते.खालील साहित्याचा वापर करून सुलभपणे तुम्ही घरीच पेडिक्युअर आणि मॅनिक्युअर करू शकता.
नेलफायलर (Nail Filor) :- हे लाकडी तसेच स्टीलमध्येही बाजारात उपलब्ध आहेत. ह्याचा वापर नखांना शेप देण्यासाठी करतात .
क्युटिकल पुशर (Cutical Pushar ) :- यामुळे नखांमधील क्युटिकल्स मागे ढकलली जातात. आणि नखांचा आकार वाढतो.क्युटिकल रिमूव्हर ( Cutical Remover ) :- याचा वापर नखांमधील क्युटिकल बाहेर काढण्यासाठी होतो.
नेलब्रश (Nail Brush ):- याने नखे आतून बाहेरून स्वछ केली जातात.
क्युटिकल सॉफ्टनर ( Cutical Softner ) :- हे मॅनिक्युअर करण्यापूर्वी नखांना लावतात आणि हात कोमट पाण्यात भिजवतात. यामुळे क्युटिकल्स लवकर निघतात.
ऑरेंज स्टिक (Orange Stick) :- हि संत्र्याच्या झाडाची काडी असते. याने नखे आतील बाजूने साफ केली जातात.
हॅन्ड अँड बॉडी लोशन ( Hand And Body Lotion) :- याने हाताना व पायांना मसाज केला जातो . याऐवजी मॉईशराइझर वापरले तरी चालते.
शाम्पू (Shampoo) :- शाम्पू कोमट पाण्यात टाकतात यामुळे हात पायावरील मळ निघण्यास मदत होते.
ऍसिटोन (Acetone) :- ह्याचा वापर नेलपेंट काढण्यासाठी करतात.
हायड्रोजन पॅरॅक्सॉइड (Hydrogen Paraxsoide) :- यामुळे नखांवरील आणि हातावरील , पायावरील काळे डाग जायला मदत होते . कोमट पाण्यात डागानुसार ह्याचे प्रमाण कमी जास्त करता येते.
फूट स्क्रॅपर (Foot Scraper) हे टाचांवर घासल्याने तेथे जमा झालेली डेड स्किन निघण्यास मदत होते. त्यामुळे टाचावरील भेगा कमी होतात.
फ्युमिक स्टोन ( Fyumic Stone) :- फ्युमिक स्टोनमुळे हातावरील डेड स्किन काढली जाते.
मसाज क्रिम (Massage Cream) :- याने हाताला आणि पायाला मसाज केला जातो त्यामुळे आराम भेटतो आणि रक्ताभिसरण चांगले होण्यास मदत होते.
वरील साधनांचा वापर करून तुम्ही घरच्या घरीही पेडिक्युअर आणि मॅनिक्युअर करू शकता . किंवा तुमच्या पार्लरमध्येही याचा वापर करू शकता.

0 टिप्पण्या