नखांची काळजी कशी घ्यावी
नखे शरीराचा एक महत्वाचा भाग आहेत म्हणून त्यांची निगा राखणे फार आवश्यक आहे सतत नेलपेंड नखांवर ठेवल्याने त्यांना हवा,प्रकाश,ओलावा मिळत नाही. यामुळे नखे पिवळी पडतात.
नखांवरील पिवळे डाग दूर करण्यासाठी खालील उपाय करावेत.
नेलपेंड रिमूव्हरचा वापर व्यवस्थित करावा.
कॉटनवर नेलपेंड रिमूव्हर घेऊन पटकन नेलपेंड काढावी
एकाच ठिकाणी कॉटन जास्तवेळ घासू नये.
नखे पांढरीशुभ्र दिसण्यासाठी त्यावर लिंबू चोळावे.
महिन्यातून एकदातरी संपूर्ण हाताची मालिश करून घ्यावी.
नेहमी चांगल्या नेलपॉलिशचा वापर करावा.
कमीतकमी एक आठवडा तरी नखे नेसर्गिक अवस्थेत ठेवावी.
जास्त गडद रंगाची नेलपेंड वापरल्याने नखे काळसर वाटतात.
नखे खूप वाढू देऊ नये त्यामुळे नखे शरीरातील कॅल्शिअम खेचून घेतात कारण त्यांना जिवंत राहण्यासाठी कॅल्शिअम लागते.
नखांना आपल्याला हवा तासा आकार देण्यासाठी नेलफायलर चा वापर करू शकतो
नेलब्रशने नखे महिन्यातून एकदा दोनदा साफ करावी
तुम्हाला आवडत असेल तर काही विशेष प्रसंगी नेल आर्ट करू शकता.

0 टिप्पण्या