Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

घरच्याघरी कोल्ड वॅक्स | How To Do cold Wax At Home Easy Step


How To Do cold Wax At Home Eazy Step                   


                वॅक्स करण्यासाठी आपल्याला पार्लर मध्ये जावे लागते. परंतु काहीवेळेस आपल्याकडे तेवढा वेळ नसतो , किंवा अपॉइंटमेंट मिळत नाही. तेव्हा खालील उपाय तुम्ही घरच्याघरी आणि कमीतकमी साधनांमध्ये करू शकतो. आणि त्याचे साईड इफेक्ट हि होत नाहीत कारण घरातील पदार्थापासून आपण हे वॅक्स तयार करतो.  


घरच्याघरी कोल्ड वॅक्स 

साहित्य :- एक कप साखर,अर्धा लिंबाचा रस,चार टेबल स्पून पाणी. वॅक्सपट्टी (कुठल्याही मेडिकल मध्ये उपलब्ध असतात.)

कृती:- एका पातेल्यात मंद गॅसवर साखर परतून कॅरॅमल करून घ्या . साखरेला तपकिरी रंग आल्यावर त्यात पाणी आणि लिंबाचा रस घालून हलवावे. द्राव चिकट झाला पाहिजे मग गॅस बंद करून ते थंड करा. 

केसांच्या वाढीच्या दिशेने म्हणजेच वरून खाली या दिशेने वॅक्स एकसारखे लावा. त्यावर वॅक्सपट्टी  ठेऊन परत केसांच्या वाढीच्या दिशेने हात पट्टीवरून फिरवा. 

आता केसांच्या विरुद्ध दिशेने पट्टी एका झटक्यात काढा . हि पट्टी जितक्या जोराने व अचूकपणे ओढली जाईल तितकेच कमी दुखते. आणि केसही निघतात. 

हे त्वचेवरील सर्व केस काढल्यावर त्वचा मऊ कापडाने किंवा कॉटनने पुसून घ्यावी. 

नंतर मसाज क्रिमने १० मिनिटे मसाज करावा. 

अशाप्रकारे जेव्हा आपल्याकडे वेळ नसेल तरी घरच्याघरीही आपण आपली स्किनची काळजी घेऊ शकतो आणि आपल्या सौन्दर्यात भर पाडू शकतो. 


Woman photo created by valuavitaly - www.freepik.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या