नेल आर्ट - Nail Art
हल्ली नेल आर्टची क्रेझ सर्वत्र दिसून येते त्यासाठी बयूटिशियन कडे विशेष असे कसब असावे लागते. प्रत्येकालाच वाटते कि आपली हाताची पायांची नखे देखील सर्वांवर चांगला प्रभाव टाकणारी असावी. तुम्ही प्रथमच नेल आर्ट करत असाल तर घ्यावयाची काळजी आणि टिप्स
नखांवरच आधीच नेलपॉलिश रिमूव्हर ने काढा.
नखे धुवून घ्या आणि त्यांना योग्य तो शेप द्या
कोमट पाण्यात ग्लिसरीन ४ - ५ थेम्ब टाकून त्यात बोटे ५ मिनिटे बुडवून ठेवा.
शक्यतो नखे मोठीच ठेवावीत कारण त्यामुळे डिझाईन काढायला सोपे जाईल
सर्वात आधी बेस कोट लावून घ्यावा.
बेस कोट फेंट व पारदर्शक असावा. तो पूर्णपणे वाळू द्यावा.
सुरुवातीला नेल आर्ट करताना दोन रंग निवडा
त्यासाठी एक बॅकग्राऊंड कलर लावून घ्या त्यात तुम्ही झेब्रा , डॉट्स ,फुलपाखरू ,हार्ट शेप , फ्लॉवर, पोलका डॉट्स , स्टार आणि छोटे बटन्स याचा वापर करावा .यासाठी डार्क कलर वापरावा .
लहान कुंदन किंवा टिकल्या त्यावर लावू शकता .
तुम्हाला बारीक डिझाईन हवे असल्यास टूथपिक किंवा एअर बड्स तसेच टाचणी किंवा सेफ्टी पिन्स वापरू शकता.
हा कोट पूर्णपणे वाळू द्या.
दोन रंग वापरून शेड्स देता येतील त्यावर ग्लिटर नेलपेंट लावून चमक देऊ शकता
दोन तीन कलर एकावर एक लावताना पहिला पेंट सुकल्याशिवाय दुसरा देऊ नये.
डिझाईन पूर्ण झाल्यावर त्यावर टॉप कोट देण्यासाठी ट्रान्सफरंट कलर द्यावा.

0 टिप्पण्या