तेलकट केसांवर उपचार पद्धती
Treatment For Oily Hair Problem
प्रथम तेलकट केसावर केमिकलयुक्त शाम्पूचा वापर टाळा. केसातील तेलकटपणा जाण्यासाठी जर तुम्ही वारंवार शाम्पू किंवा लोशनचा वापर करत असाल तर त्यामुळे तुमच्या केसातील नैसर्गिक तेलद्रव्ये नष्ट होऊन केस कोरडे पडण्याची शक्यता आहे. त्यावेळी टोनरने केसांना आणि मुळांना नियमित मसाज करावा.
मसाज करावा. पुढे काही उपाय देत आहे याचा वापर केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.
शाम्पू
२ चमचे शिकेकाई पावडर , १ चमचा बेसन ,१/२ चमचा मेथी पावडर त्यात अंड्याचा पांढरा बलक एकत्र करून याचा शाम्पूप्रमाणे केस धुताना वापरावे.
एक ग्लास रिठे पाच ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा सकाळी रिठे कुस्करून पाणी गाळून घ्या . यात २ चमचे शिकेकाई पावडर टाकून मिक्स करा आणि शाम्पूप्रमाणे वापर करा.
त्रिफळा चूर्ण २ चमचे, १ चमचा मध आणि २ चमचे मुलतानी माती पाण्यात भिजऊन शाम्पू म्हणून वापरावे
संत्रा साल आणि शिकेकाई आणि त्रिफळा १ ग्लास पाण्यात उकळवून केसांना लावा आणि धुवा

0 टिप्पण्या