Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

वॅक्सिंग चे प्रकार | Types of Waxing


वॅक्सिंग (Waxing)

                डोक्यावरील लांबसडक केस स्त्रियांसाठी अभिमानाची गोष्ट मानली जाते. डोक्यावरील केस वाढावेत म्हणून महिला शक्य ते सर्व प्रयत्न करीत असतात. परंतु त्यांना नितळ आणि कांतिमान चेहऱ्यावरील लव मात्र स्त्रीसौदर्यास हानिकारक ठरते. आपल्या चेहऱ्यावर , हातावर,पायावर लव येऊ नये आणि आलीच तर तिचे निर्मूलन व्हावे असे वाटते. जसे आपण डोक्यावरील केस वाढावेत दाट व्हावेत यासाठी प्रयत्नशील असतो. तसेच बाकी शरीरावरील केस नकोसे असतात कारण ते आपले सौन्दर्य कमी करतात. 

निरनिराळ्या औषधांचा वापर , हार्मोन्समधील बदल , चुकीचा आहार विहार आणि अनुवंशिकता यामुळे चेहऱ्यावर लव येते याप्रकारच्या अनावश्यक केसांवर उपचार खालील दोन प्रकारे होतो. 


डेपिलेशन :- या पहिल्या पद्धतीत धाग्याच्या साहाय्याने किंवा केमिकलचा वापर करून त्वचेवरील अनावश्यक केस काढून टाकता येतात. 

थ्रेडींग :- म्हणजेच धाग्याच्या साहाय्याने केस उपटून काढणे . आणि प्लकर च्या साहाय्याने केस प्लकिंग करून काढून टाकणे . यामध्ये जास्तकरून भुवया आणि ओठांवरील केस काढण्यास मदत होते. या प्रक्रियेत त्वचेला थोड्याप्रमाणात वेदना होतात 

केमिकल्स :- नको असलेले केस काढण्यासाठी आजकाल बाजारात अशी पावडर,क्रीम, आणि द्रवस्वरूपात मिळतात. हे काहीवेळ त्वचेवर ठेऊन नंतर कापूस किंवा प्लॅस्टिकच्या पट्टीने ती काढता येतात . हि प्रसाधने केसांच्या मुळापर्यंत जाऊन ती जाळण्याची क्रिया करतात. त्यामुळे केस सहजपणे निघतात. 

                हि पद्धत वेदनारहित असली तरी यात केमिकल्सचा वापर केल्यामुळे त्वचेला ऍलर्जी येऊ शकते. यात निघालेले केस त्वचेलगत तुटल्यासारखे होतात. आणि दुसऱ्या दिवसापासून तेथील केसांची वाढ होण्यास सुरुवात होते. याचा सतत वापर केल्याने त्वचा कोरडी होते तसेच काळपट डाग पडतात. त्यामुळे हि केमिकलयुक्त प्रसाधने वापरण्यापूर्वी स्त्रियांनी विचार करणे गरजेचे आहे विशेषतः ओठ , हनुवटी आणि चेहरा यावर लावण्यापूर्वी विचार करावा. 

वॅक्सिंग 

त्वचेवरील नको असलेले केस काढण्याचा वॅक्सिंग हा उपाय जास्त प्रमाणात केला जातो. संपूर्ण शरीरावरील अनावश्यक केस वॅक्सिंगच्या साहाय्याने सहज काढता येतात. त्यामुळे हा प्रकार अधिक प्रचलित झाला आहे. 

बाजारात मिळणारे वॅक्स दोन प्रकारचे असतात. हॉट वॅक्स आणि कोल्ड वॅक्स. 

बऱ्याच जणींना या दोन्हीतील फरक माहित नसतो. 

हॉट वॅक्स लावण्यापूर्वी गरम करावे लागते.

कोल्ड वॅक्स गरम किंवा थंडही वापरता येते. वॅक्स गरम करण्याची एक खास पद्धत आहे. ज्यात वॅक्स एका पत्र्याच्या भांड्यात घेऊन गरम पाण्याच्या पातेल्यात ठेऊन गरम करतात. किंवा वॅक्स इलेक्ट्रिक हिटर बाजारात उपलब्ध असतात त्यातही आपण गरम करू शकतो. 

वॅक्स गरजेइतके गरम करून प्लास्टिक स्टिकने शरीरावर किंवा ज्या भागाचे केस काढावयाचे आहेत त्या भागात लावून वॅक्स पट्टी त्यावर दाबून ओढावी. 

वॅक्सिंग योग्य प्रकारे केल्यास केस मुळापासून निघून येतात. 

नियमितपणे वॅक्स केल्यानं केसांची मुळे कमकुवत होतात आणि कालांतराने त्या भागावर केस उगवण्याची प्रक्रिया थांबते. 

सर्वात महत्वाचे म्हणजे वॅक्स केल्यावर त्वचा सैल पडणे , काळे डाग पडणे हे दुष्परिणाम त्वचेवर दिसून येत नाही. 

परंतु वॅक्स केल्यावर त्वचेची काळजी घ्यावी कारण वॅक्सिंग मुले त्वचेची केशमुळे उघडी पडलेली असतात. त्या भागावर पुरळ किंवा ऍलर्जी होऊ ना देण्यासाठी त्यावर आस्ट्रिजन्ट किंवा डेटॉल जंतुनाशक लावून धुवावे. 

एपिलेशन 

या प्रकाराला इलेकट्रोलिसीस म्हणतात. परंतु हा उपाय तज्ञांकडून करून घ्यावा लागतो. या प्रकारात केसांच्या मुळांना इलेक्ट्रिक शॉक देऊन ते निष्प्राण केले जातात. नंतर ते केस प्लकर ने उपटले जातात. चेहऱ्यावरील , विशेषतः ओठ आणि हनुवटीवरील अनावश्यक केस काढण्यासाठी हि उपचार पद्धती उपयोगी ठरते. हा उपाय कायमस्वरूपात उपयुक्त ठरणारा आहे. कारण या उपचारादरम्यान एकदा मृत झालेली  केसांची  मुळे पुन्हा जिवंत होत नाहीत. त्यामुळे तिथे पुन्हा केस उगवत नाहीत . 


Technology photo created by senivpetro - www.freepik.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या