दुधी भोपळ्याच्या सालीची चटणी रेसिपी
कोर्स: लंच । डिनर
पाककृती: भारतीय
तयारीची वेळ: ५ मिनिटे
कूक वेळः ५ मिनिटे
एकूण वेळ: १० मिनिटे
सर्व्हिंग्ज: 4 सर्व्हिंग्ज
साहित्य :-
- दुधी भोपळ्याच्या साली ( खिसलेल्या)
- १/४ चमचा हळद
- १/४ चमचा लाल तिखट
- १/४ चमचा मीठ
- १/४ चमचा तेल
- १ चमचा पांढरे तीळ
कृती :-
- एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणी जिरे तडतडून घ्यावे
- मग त्यात हळद , लाल तिखट आणि मीठ टाकावे. परतून घ्यावे.
- नंतर त्यात तीळ टाकून मिक्स करावे.
- दुधी भोपळ्याच्या खिसलेल्या साली टाकून व्यवस्थित एकजीव करावे.
- पाच मिनिटे झाकण ठेऊन शिजवून घ्यावे.
- आपली चटणी तयार आहे.
0 टिप्पण्या