Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

राजस्थान | Rajasthan

 

Rajashtan

    राजस्थान म्हणजे अरवली पर्वत असलेला प्रदेश यात तुम्हाला रखरखीत वाळवंट आणि बरोबरीने काही शेती प्रदेश पाहावयास मिळतो . राजस्थानला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे . येथे तुम्हाला बांधणी कपडे,लाखेच्या बांगड्या , कुंदन,आणि वेगवेगळ्या खड्यांचे दागिने , शोभेच्या कापडी बाहुल्या , विविध प्रकारचे हस्तकला केलेल्या वस्तू खरेदी करता येतील. 


आज आपण पाहणार आहोत राजस्थान मधील  प्रेक्षणीय स्थळे. 


माऊंट अबू 

हे राजस्थानमधील थंड हवेचे ठिकाण आहे. जगात प्रसिद्ध असलेले हे पर्यटनस्थळ आहे. 

तेथे तुम्हाला अत्यंत नाजूक कोरीव काम केलेले संगमरवरी मंदिर आहे . मंदिराची वेळ दुपारी १२ ते सायंकाळी १२ पर्यंत आहे. 

येथील सनसेट पॉईंट पाहण्यासारखा आहे. तसेच येथे नरवी लेक , अबुर्दा देवी मंदिर , गुरु शिखर हे पाहण्यासारखे आहे. 

येथे हिवाळ्यात दुपारी भरपूर ऊन आणि रात्री खूप थंडी असते.  


कसे जावे -: मुंबई हुन किंवा पुण्याहून अहमदाबाद ट्रेन पकडून तेथून बसेस भेटतात ,माऊंट अबू २०० किमी आहे. 

किंवा ट्रेनने अबू रोड स्थानकाहून २८ किमी आहे. 


उदयपूर 

लेक सिटी ऑफ इंडिया अशी ओळख असलेले आणि वेगवेगळे राजवाडे , बगीचे यांनी सजलेले उदयपूर पाहताना तुम्हाला नक्कीच राजेशाही थाटाचा आनंद होऊ शकेल हे नक्की. 

येथे तुम्हाला मोतीमगरी टेकडीवरील महाराणा प्रताप यांचं स्मारक,सिटी पॅलेस , भारतीय लोककला म्युझिअम , तसेच सहेलीयो कि बाडी हा सुंदर आणि निसर्गरम्य बगीचा हि स्थळे पाहता येतील. 

उदयपूरपासून २२ कि.मी. वर उदयपूरच्या महाराणाचं कुलदैवत असलेले एकलिंगजी महाराज मंदिर आहे. 

वैष्णव तीर्थस्थान असलेले नाथद्वारा उदयपूरहून ५० किमी. आहे तेथे जाण्यासाठी लोकल बसेस किंवा खाजगी वाहने उपलब्ध आहेत. 

महाराणा प्रताप आणि अकबर बादशाह यांचे युद्ध झालेले ठिकाण म्हणजे हळदी घाटी हे ठिकाण उदयपूरपासून ४० किमी. वर आहे. 

उदयपूरपासून १०० किमी. वर रानाकपुरला तुम्हाला संगमरवरी कोरीव काम केलेला जैन मंदिराचा नेत्रदीपक अविष्कार पाहायला मिळेल. इथे संगमरवराचे कोरीव काम केलेले खांब दिसून येतील . हे खांब लहान मोठे आणि प्रत्येक खांबांची नक्षीही वेगवेगळी आहे. 

राजस्थानला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे . उदयपूर व्यवस्थित पाहण्यासाठी ४  दिवस लागतात.  


 चित्तोड 

यात सर्वप्रथम येतो तो चित्तोडगड . हा किल्ला १३ किमी. क्षेत्रफळात पसरलेला आहे. किल्ला उंच टेकडीवर असून तेथे पोहचण्यासाठी खाजगी वाहने भेटतात. किंवा बसने जाता येते. 

त्यात तुम्हाला राणी पद्मिनीचा महाल, जोहर कुंड , विजयस्तंभ तसेच संत मीराबाईचा मंदिर,

फत्तेप्रकाश राजवाड्यातील म्युसिअम , राणा कुंभाचा राजवाडा. हि सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहावयास मिळतील. 


अजमेर 

येथून जवळ असलेले पुष्कर हे तीर्थक्षेत्र आहे तेथे ब्रह्मदेवाचे मंदिर भारतात एकमेव  आहे ते अजमेरहून ११ कि.मी.वर आहे. येथे प्रत्येक कार्तिक पौर्णिमेस मोठी यात्रा भरते. 

येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तीच्या दर्गा आहे अजमेर शरीफ या नावाने प्रसिद्ध आहे. येथे मागितलेली "मन्नत " पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. बाराही महिने येथे गर्दी असते.

अनासागर कृत्रिम तलाव हे आणखी एक प्रेक्षणीय स्थळ आहे. 


जयपूर 

जयपूर हि राजस्थान राज्याची राजधानी आहे. याला "गुलाबी शहर " म्हणतात. याचे कारण येथे गुलाबी रंगाचा दगड मोठ्या प्रमाणावर आहे. जयपूर हे चारही बाजूनी डोंगरांनी वेढलेले आहे आणि तेथे गुलाबी दगड आढळतो . येथे आमेर फोर्ट हा जयपूरपासून १२ किमी आहे. हा किल्ला राजा मानसिंग याने बांधकाम सुरु केले. 

सिटी पॅलेस , हवामहल ,मुबारक महल , सातमजली चांद्रमहल , रामबाग पॅलेस या सर्व महले जयपूरची शान म्हणावी लागेल.  हे सर्व महल अत्यंत प्रेक्षणीय असे आहेत. यात असणारे घुमट , जाळीदार खिडक्या , सुसज्ज अशा खोल्या , मोठमोठ्या बागा , त्यात असलेले कारंजे,जलाशये यांनी अगदी डोळ्याचे पारणे न फिटले तरच नवल.... 


सांगानेर हे जयपूरपासून १५ किमी अंतरावर असलेले जैन मंदिर हे संगमरवराचे असून त्याचे कोरीव काम अप्रतिम असे आहे. तसेच हे कापडावरील हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहे. 

गलताजी येथे एक पवित्र कुंड आहे. येथे सूर्यमंदिर आहे. आणि गोमुखातून पडणाऱ्या पाण्याचे हे कुंड असून त्यात स्नान करणे पवित्र मानले जाते. 


जयपूरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जयपूर मुसीएम किंवा अल्बर्ट हॉल संग्रहालय . याचे बांधकाम लाल दगडाचे आणि संगमरवराचे आहे. यामध्ये तुम्हाला हस्तिदंत आणि लाकूड यावरील कोरीव काम पाहावयास मिळते. 

चिनी मातीच्या मूर्ती, विविध प्रकारच्या भांड्यावर केलेले कोरीव काम , भिंतीवरील चित्रे पाहावयास मिळतात. 


बिर्ला मंदिर हि  तर जयपूरची ओळख बनलेली आहे.हे मंदिर अतिशय भव्य आहे मंदिराला तीन कळस आहेत . यात श्री लक्ष्मी-विष्णू यांच्या सुबक आणि प्रसन्न अशा मूर्ती आहेत . आणखी देवतांची सुद्धा मंदिरे आहेत . 

जयपूर दिल्लीपासून अंदाजे ३१० कि.मी. आहे. 


हे सर्व वाचताना प्रत्येकजण नक्कीच मनाने राजस्थानला पोहोचला असेल यात शंकाच नाही. 

Travel photo created by rawpixel.com - www.freepik.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या