सूर्यनमस्कार हा एक प्रकारचा योगाभ्यास आणि व्यायाम ह्याचे एकत्रीकरण आहे. तसेच सूर्यनमस्कार केल्याने भक्ती किंवा देवाची प्रार्थना केल्याचे समाधान मिळते कारण भारतीय संस्कृतीमध्ये देवी देवतांसोबत , ग्रह आणि तारे यांनाही देवासमान मानतो.
सूर्यनमस्काराच्या वेळी घ्यावयाची नावे
- ऊ मित्राय नमः
- ऊ रवये नमः
- ऊ सूर्याय नमः
- ऊ भानवे नमः
- ऊ खगाय नमः
- ऊ पूषणे नमः
- ऊ हिरण्यगर्भाय नमः
- ऊ मरिचये नमः
- ऊ आदित्याय नमः
- ऊ सावित्रे नमः
- ऊ अर्काय नमः
- ऊ भास्कराय नमः
सकाळी सूर्यनमस्कार घातल्यामुळे लवकर उठण्याची सवय लागते ,त्यामुळे मन प्रसन्न होते. संपूर्ण दिवस उत्साह वाटतो.
शरीराचे सर्वच अवयव फिट राहण्यास मदत होते , पोटाची वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होते. मणक्याचे दुखणे काही प्रमाणात कमी होते. याने तुमचे मन शांत होईल, त्यामुळे हृदयावरील ताण कमी होण्यास मदत होते . सूर्यनमस्कार करण्यासाठी फारच कमी वेळ लागतो . सूर्यनमस्कार सकाळी , रिकाम्या पोटी करावा. सुरुवातीला मोजके सूर्यनमस्कार करून नंतर संख्या वाढवावी.सूर्यनमस्कार करताना वरील नावे घ्यावी . हि सर्व सूर्यदेवाची नावे आहेत.
0 टिप्पण्या