बनाना हेअर स्टाईल - Banana Hair Style
नेहमी नेहमी एकाच प्रकारची हेयरस्टाईल करण्याचा कंटाळा येतो . म्हणून आज आपण बनाना हेअर स्टाईल कशी घालायची हे पाहूया.
साहित्य :- लार्ज कोम्ब , टेल कोम्ब , हेअरस्प्रे, साध्या क्लिप्स , यू क्लिप्स ,डेकोरेशनसाठी मोती आणि गजरे.
वेळ :-10 -15 मिनिटे
कृती :-
लार्ज कोम्बने केसातील सर्व गुंता काढून घ्यावा. आणि टेल कोम्बने केस व्यवस्थित विंचरून घ्यावी .
पुढील केस आपल्या चेहऱ्याला आवडतील अशाप्रकारे वळवून त्याला साध्या क्लिप्स लावाव्यात .
आता मागील सर्व केसांचा उंच पोनीटेल बांधावा
पोनीचे दोन सामान भाग करावेत.
प्रथम केसांचा एक पेड साधी वेणीचा घालून घ्यावा आणि नंतर त्यात बाहेरील बाजूचे केस सागर वेणी प्रमाणे गुंफत जावे .
शेवटी केस दोन इंच राहिल्यावर त्याची साधी वेणी शेवटपर्यंत घालून ग्यावी
आता दोन्ही वेण्यांचे शेवटचे टोक पकडून एकत्र करून पोनीखाली दुमडून पिनप करावे.
डेकोरेशन साठी मोती लावावे.
नंतर थोडा हेअरस्प्रे मारावा म्हणजे केस बाहेर सुटणार नाहीत.
दोन्ही बाजूचे वेणी दोन बनाना असल्यासारखे वाटते.
0 टिप्पण्या