अक्षयतृतीया
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला महत्वाचा भारतीय सण. असे म्हणतात कि , या दिवशी केलेल्या गोष्टी कधीही लयास जात नाहीत म्हणजेच अक्षय राहतात. म्हणून यादिवशी सोने खरेदी , नवीन घर खरेदी, कपडे खरेदी केले जातात. तसेच भूमिपूजन केले जाते . राजस्थान, महाराष्ट्र , गुजरात , उत्तर प्रदेश या ठिकाणी यादिवशी मोठ्या प्रमाणात विवाह केले जातात.
अक्षय्य त्रितीयेच्या दिवशी पितरांची पूजा करण्याची रीत आहे. अक्षयत्रितिया हि परशुराम जयंती असते . या दिवशी मातीचे माठ खरेदी आणि दान करण्याची प्रथा आहे.
यादिवशी आंबे खरेदी करून त्याची पूजा करून नंतर खाण्यास सुरुवात करतात. तसेच लक्ष्मीदेवी आणि श्रीविष्णू यांची पूजा करतात याने आपल्यावर लक्ष्मीदेवी सदैव प्रसन्न राहते.
या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा शुभविवाह झाला. अशी आख्यायिका आहे.
0 टिप्पण्या