सुंदर दिसणे हा प्रत्येक स्त्रीचा हक्क आहे असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. परंतु आजकालच्या शर्यतीच्या युगामध्ये स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ भेटत नाही परिणामी आपली स्किन रापते . त्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे "ब्लिच ". परंतु ते करताना विशेष काळजी घेणे महत्वाचे ठरते तर पाहुयात ब्लिच करताना काय काळजी घ्यावी.
ब्लिच कधी करावे
चेहरा उन्हामुळे काळपट झाला असेल तर ब्लिच करावे.
हार्मोनल चेंजेस मुळे जर स्किनवर लव आली असेल किंवा केसांची वाढ होत असेल तर ब्लिच करून केसांचा रंग स्किन कलरचा करण्यासाठी वापर करू शकता
ब्लिच करण्या अगोदर प्रथम ऍलर्जी टेस्ट करावी त्यासाठी थोडे ब्लिच घेऊन कानाच्या मागे किंवा हातावर लावावे. १५ मिनिटे तसेच ठेऊन नंतर ते धुवावे , आणि पाहावे कि राशी , पुरळ आले आहेत का
जर ऍलर्जी टेस्ट करूनही जर चेहऱ्यावर रॅश आले किंवा स्किन लाल झाली तर लगेच कॉटनमध्ये बर्फ घेऊन चेहऱ्याला मसाज करावा किंवा मॉईशराइझर , कोल्ड क्रीमने मसाज करावा
महिन्यातून एकदाच ब्लिच करावे
ब्लिच कधी करू नये
चेहऱ्यावर पिंपल्स म्हणजेच तारुण्यपिटिका असल्यास ब्लिच करू नये कारण त्यामुळे त्वचेला रॅश येऊ शकते
चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची जखम असेल तर अशावेळी ब्लिच करू नये
स्किन संवेदनशील सेन्सेटिव्ह असेल तर ब्लिच करू नये
ऑपरेशन झालेल्या ठिकाणी ब्लिच करू नये
ब्लिच करताना घ्यायची काळजी किंवा दक्षता
ब्लिच करताना डोळ्यांना आणि ओठांना लावू नये
ब्लिच क्रीम लावल्यानंतर डोळे बंद ठेवावेत तसेच त्यावर गुलाबपाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात .
ब्लिच करताना ऍलर्जी टेस्ट करणे अत्यंत आवश्यक आहे.
ब्लिच क्रीम लावल्यावर स्किन खाजत असेल किंवा जळजळत असेल तर लगेच चेहरा स्वछ पाण्याने धुवावा.
ब्लिच करताना गोऱ्या स्किन साठी १० मिनिटात धुवावे आणि सावल्या स्किनसाठी २० मिनिटांच्या वर ठेऊ नये.
तुम्ही केमिकलविरहित घरगुती ब्लिच करू शकता
दही आणि लिंबू रस
ग्लिसरीन आणि मुळ्याचा रस एकत्र करून ब्लिच करू शकता

0 टिप्पण्या