त्रिपुरारी पौर्णिमा महत्व
कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात
याची एक कथा आहे त्रिपुरासुर नावाचा एक राक्षस होता . त्याच्याकडे तीन नगरांचे अधिपत्य होते आणि त्यावरूनच त्याचे नाव पडले होते . त्याने ब्रह्मदेवाचे आराधना करून प्रसन्न करून घेतले. त्यांनतर तो उन्मत्त झाला. निरपराध जनतेला त्रास देऊ लागला. तेव्हा देवलोकानी भगवान शंकरांना प्रार्थना केली कि तुम्हीच आता त्रिपुरासुराचा नाश करावा. त्यानुसार भगवान शंकरानी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरासुराचा तिन्ही नगरे जाळून त्याचा वध केला. सर्व जनतेने दीप लावून आनंदोत्सव साजरा केला. तसेच या दिवशी भगवान शंकरापुढे १०८ वाती लावल्या जातात याला त्रिपुर वाती असे म्हणतात. तसेच मंदिरातील नंदादीप प्रज्वलित केला जातो. नदीमध्ये दिवे सोडले जातात.
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी वर्षातून फक्त एकदा भगवान कार्तिक स्वामींचे मंदिरांचे दरवाजे उघडून पूजा अर्चा आणि दर्शन घेऊ शकतो. याची एक कथा आहे कि
एकदा भगवान शंकर आणि पार्वती माता आपल्या जागेवर बसले होते. आणि कार्तिक स्वामी आणि गणपती कैलास पर्वतावर खेळत असताना त्यांच्यात सर्वश्रेष्ठ कोण यावरून विवाद झाला तेव्हा नंदी बोलले कि, आपण हे भगवान शंकराना विचारू
0 टिप्पण्या