कोमल - नाजूक हात आणि पाय
चेहरा मनाचा आरसा असतो असे म्हणतात म्हणून सगळे चेहरा जपतात,खूप काळजी घेतात. चेहऱ्याच्या सौन्दर्याकडे लक्ष देता देता आपण आपले हात आणि पायांची काळजी घेणे विसरून जातो. पण हात आणि पाय खूपच महत्वाचे अवयव आहेत त्यामुळे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यातही थंडीच्या दिवसात हात आणि पाय रुक्ष होतात,उन्हाळ्यात काळवंडतात. त्यासाठी घ्यावयाची काळजी आणि उपाय खाली देत आहे याचा तुम्हाला फायदा होईल
नेहमी मॉईशराइझर क्रीम वापरावे म्हणजे पायाची हाताची त्वचा रुक्ष होणार नाही
पायात नेहमी बूट , चप्पल किंवा सॅंडल घालावे
घरात असलात तर स्लीपर घालून ठेवावे कारण घरातील फारशी थंड पडलेली असते
रात्रीच्या वेळी कोमट तेलाने मालिश करावी
जर जखम झाली असेल तर त्याला मलम लावून बरी करावी
मालिश केल्यानंतर टबमध्ये कोमट पाणी किंवा सहन होईल तेवढे गरम पाणी घेऊन त्यात पाय टाकून ठेवावे नंतर टॉवेलने कोरडे करावे
पाय ओलसर ठेऊ नका लगेच पुसून कोरडे करावे
0 टिप्पण्या