मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करताना कोणती तयारी आणि स्वयंपाक करण्याचे तंत्र समाविष्ट आहे? मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करताना कोणती तयारी आणि स्वयंपाक करण्याचे तंत्र समाविष्ट आहे?
महत्त्वाच्या टिप्स
हा प्रश्न कधीना कधी प्रत्येक गृहिणीला पडतोच.तर पाहुयात मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करताना काय करावे.
१. सर्वप्रथम किती माणसांचा स्वयंपाक आहे त्यांची लिस्ट बनवावी. जितकी संख्या येईल त्यापेक्षा ५ लोकांची जास्त मोजावी.
२. मेनू ठरवून घ्यावा. व्हेज कि नॉनव्हेज ठरवावे.
३. नंतर वस्तूंची यादी करावी . त्यातही फ्रिजबाहेर राहणाऱ्या वस्तूंची यादी वेगळी करावी उदा. तांदूळ डाळ यांची यादी वेगळी , आणि दही, दूध आणि भाज्या यांची यादी वेगळी करावी.
4.कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सर्व वस्तू आणून ठेवाव्यात
5.शक्यतो गरजेपेक्षा जास्त भाज्या वगैरे आणाव्यात , म्हणजे आयत्या वेळी लागल्या तर वापरता येतील.
6.आदल्या दिवशी आले लसूण पेस्ट तयार करावी
7.भाज्या निवडून चिरून हवा बंद डब्यात भरून ठेवावे
8.हिरवी मिरची लसूण पेस्ट करून ठेवावी
9.शेंगदाणे भाजून ठेवावेत.
10.ओले खोबरे खोऊन ठेवावे.
11.दही लावावे.
12.दहीवडे करणार असाल तर डाळ भिजवून ठेवावी.
13.पुरणपोळी करणार असाल तर डाळ शिजवून पुरण वाटून डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेऊ शकता.
14.चिकन करणार असलात तर आदल्या दिवशी रात्री चिकन आणून धुऊन त्याला आले लसूण पेस्ट,हळद , मीठ, दही इत्यादी लावून फ्रिजमध्ये ठेऊन मेरिनेशन करू शकता .
वरीलप्रकारे तयारी करून तुम्ही जास्तीचा किंवा एखाद्या कार्यक्रमाचा स्वयंपाक आरामात आणि वेळेत करू शकता.
गरज असेल तर एखादी मदतनीस ची मदत घेऊ शकता.
0 टिप्पण्या