मानेचे सौन्दर्य
चेहरा आणि हात यांच्या सौन्दर्याकडे जसे रेगुलर लक्ष दिले जाते तसे मानेच्या सौन्दर्याकडे पूर्ण लक्ष देता येत नाही. आपण बाहेर उन्हात जातो त्यामुळे मानेची स्किन रापते . त्यावर धूळ बसते आणि काळपट होते.
त्यासाठी खालील टिप्स करून पहा आणि काही दिवसातच आपली मान सुंदर बनवा.
मानेच्या मसाज करण्यासाठी तीळ तेल , व्हॅसलिन किंवा कोल्ड क्रीम लावावे यामुळे मानेला सुरकुत्या असतील तर कमी होतील
मसूर डाळ भिजवून वाटावी,नंतर मध मिक्स करून १/२ तास लावून ठेवावे नंतर धुवावे.
ग्लिसरीन,लिंबू,गुलाबपाणी समप्रमाणात घेऊन मानेला लावावे. याने मानेचा काळपटपणा कमी होतो.
सुरकुत्यासाठी केळी आणि दूध पेस्ट लावावी.
मानेवरील राप कमी करण्यासाठी मुलतानी माती २ चमचे दही गरजेप्रमाणे मिक्स करून अर्धा तास लावावे.
मान रोज स्क्रबरने रोज मान घासता येत नसेल तर आठवड्यातून एकदा जरूर घासावी.
कालपटपणासाठी काकडी किसून त्याचा रस मानेला १/२ तास लावून ठेवावा.
काकडीप्रमाणे बटाटा किसून लावावा त्यानेही फरक पडतो.
लिंबू रस, टोमॅटो रस आणि कोरफडीचा गर दररोज लावल्यास फरक जाणवेल.
महिन्यातून एकदा वर दिलेले पॅक नक्की करून पहा.
0 टिप्पण्या